मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ayodhya Ram Mandir: 'रामायण' मालिकेची निर्मिती करणाऱ्या रामानंद सागर यांना निमंत्रण नाही

Ayodhya Ram Mandir: 'रामायण' मालिकेची निर्मिती करणाऱ्या रामानंद सागर यांना निमंत्रण नाही

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 19, 2024 07:48 AM IST

Ramanand Sagar: राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला 'रामायण' मालिकेचे दिवंगत निर्माते रामानंद सागर यांच्या कुटुंबीयांना आमंत्रण देण्यात आलेले नाही.

ramanand sagar
ramanand sagar

अयोध्येमधील राम मंदिराच्या उद्धाघटन सोहळ्याला केवळ दोन दिवस राहिले आहेत. अनेकांच्या रामजन्मभूमीचे स्वप्न साकार होणार असल्यामुळे सगळीकडे आनंदाचा वातावरण पाहायला मिळते. मंदिरातील रामाच्या प्रतिष्ठापन सोहळ्यासाठी अनेकांना आमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, या सगळ्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या 'रामायण' मालिकेचे निर्माते, दिवंगत रामानंद सागर यांच्या कुटुंबीयांना अद्याप आमंत्रण मिळालेले नाही.

रामानंद सागर यांचा मुलगा प्रेम सागर याने नुकताच 'सकाळ' या वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी त्याने "अजूनपर्यंत आम्हाला या सोहळ्याचे निमंत्रण आले नाही. मात्र त्याचे मला दुख वाटत नाही. निमंत्रण न मिळाल्यामुळे माझी रामभक्ती कमी थोडीच होणार आहे" असे म्हटले.
वाचा: अक्षय कुमार ते हेमा मालिनी; जाणून घ्या राममंदिरासाठी कोणत्या कलाकारांनी दिली देणगी

२५ जानेवारी १९८७ मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिकेने एक इतिहास घडवला. पण तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री दिवंगत विठ्ठलराव गाडगीळ यांनी या कल्पनेला विरोध केला होता. जवळपास दोन वर्षे मालिका प्रसारित होण्यास वेळ लागला होता. 'रामायण' छोट्या पडद्यावर आल्यास देशात हिंदुत्वाची सुप्त लाट तयार होईल आणि त्याचा फायदा त्यावेळी केवळ दोन खासदार असलेल्या भाजपला मिळेल, असे त्यांचे म्हणणे होते.

त्यानंतर राजीव गांधी सरकारने ही मालिका प्रसारित करण्यास परवानगी दिली होती. जेव्हा मालिका प्रदर्शित झाली तेव्हा संपूर्ण देश हा राममय झाला होता. अवघ्या काही दिवसांमध्ये मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. मालिकेने कमी वेळात आठ कोटी दर्शक संख्येचा टप्पा पार केला होता.

WhatsApp channel

विभाग