Ayodhya Ram Mandir Kangana Ranauat: २२ जानेवारी ही तारीख इतिहासाच्या पानांवर कायमस्वरूपी सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेली आहे. तब्बल ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा झाली. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक अयोध्येत पोहोचले होते. कंगना रनौत, अमिताभ बच्चन, रजनीकांत ते अनिल अंबानी आपापल्या कुटुंबासह अयोध्येला पोहोचले. पण याचदरम्यान कंगना रनौतने एक अद्भुत घटना पाहिली, जी पाहिल्यानंतर तिचा अजूनही डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. कंगनाने सोशल मीडियावर हा अनुभव शेअर केला आहे.
प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमादरम्यान कंगना रनौत अतिशय उत्साही दिसली. रामलल्लाचा अभिषेक होताच कंगना ‘जय श्री राम जय श्री राम’ म्हणत जोरजोरात नाचताना दिसली. त्याचवेळी कंगनाने तिच्यासोबत घडलेल्या एका विचित्र घटनेचा अनुभव शेअर केला आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने संपूर्ण घटनेबद्दल सांगितले आहे. शिल्पकार अरुण योगीराज यांनी रामलल्लाची मूर्ती घडवल्याची गोष्ट शेअर करताना कंगनाने लिहिले की, 'माझ्यासोबतही एक आश्चर्यकारक घटना घडली. रामलल्लाचा अभिषेक होताच लष्कराच्या हेलिकॉप्टरने फुलांचा वर्षाव सुरू केला. त्यावेळी मी वर पाहिले, तर महाकाय पक्षी दिसत होते. लष्कराच्या हेलिकॉप्टरांच्या आजूबाजूने ते देखील उड्डाण करत होते. असं वाटत होतं जणू काही तेही फुलांचा वर्षाव करत आहेत. माझी बहीण म्हणाली की ते जटायू आणि संपती आहेत. नंतर पुन्हा मी वर पाहिले, तेव्हा ते गायब झाले होते. ते दोन दैवी पक्षी आणखी कोणी पाहिले?'
अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा झाल्यापासून असाच काही घटना सगळ्यांनीच अनुभवल्या आहेत. नुकतीच प्राण प्रतिष्ठेच्या दुसऱ्याच दिवशी रामलल्लाच्या मंदिरात एक विचित्र घटना घडली होती, जी पाहून तेथे तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांपासून ते मंदिर ट्रस्टचे अधिकारी आणि पुजारी सगळेच आश्चर्यचकित झाले होते. संध्याकाळच्या आरतीच्या काही वेळापूर्वी एक माकड गर्भगृहातील रामलल्लाच्या मूर्तीजवळ पोहोचले होते. सगळ्यांना वाटलं की, ते माकड भगवंताच्या मूर्तीची काही हानी करेल. पण, तसे काहीच घडले नाही. ते माकड प्रभू रामाच्या मूर्तीकडे एकटक बघतच राहिले आणि नंतर गपचूप तिथून निघून गेले. मंदिर ट्रस्टने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर या संपूर्ण घटनेची माहिती दिली होती.