'वॉन्टेड' या बॉलिवूड चित्रपटातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री आयेशा टाकिया गेल्या काही दिवसांपासून ट्रोलिंगमुळे चर्चेत आहे. आयशा लोकांच्या द्वेषाने इतकी अस्वस्थ झाली होती की तिने तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिअॅक्टिव्हेट केले. अलीकडेच आयशाने तिचे काही फोटो शेअर केले होते, ज्यानंतर ती सोशल मीडियावर लोकांच्या निशाण्यावर आली होती. या फोटोमध्ये आयशाचा चेहरा खूप बदललेला दिसत होता. अनेक चाहत्यांनी तिला ओळखण्यास नकार दिला. मात्र अकाऊंट डिलीट केल्यानंतर दोन दिवसांनी आयशा पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर एक नवा व्हिडिओ घेऊन परतली आहे.
आयशा टाकियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे. या बूमरॅंग व्हिडिओमध्ये अभिनेत्री आरशासमोर पोज देताना दिसत आहे. या दरम्यान तिने ब्लॅक कलरचा टी-शर्ट आणि रिप्ड जीन्स परिधान केली आहे, ज्यात ती अतिशय सुंदर दिसत आहे. यासोबतच तिने आपले केस मोकळे सोडले आहेत. ग्लॉसी मेकअप केला आहे. तसेच व्हिडीओमध्ये आयशा मिरर सेल्फी घेताना दिसत आहे.
आयशाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत, 'खूप संकोच, खूप सावध' असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये असे ऐकू येत आहे की, 'मी कशी प्रतिक्रिया दिली नाही हे तुम्ही पाहिले का? सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कोणालाही उत्तर देऊ नका, तुम्ही आनंदी रहाल.' आयशाचा हा व्हिडिओ पुन्हा एकदा इंटरनेटवर चर्चेत आला आहे. आयशाने या पोस्टमधील कमेंट सेक्शन बंद केला आहे.
वाचा : “सुरज चव्हाणने सहानुभूतीच्या जीवावर बिग बॉस जिंकलं नाही पाहिजे”, अभिनेता स्पष्टच बोलला
आयशा टाकियाने 'वॉन्टेड', 'टार्झन द वंडर कार', 'सोचा ना था' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आयशा तिच्या गोंडस स्माईलमुळे चाहत्यांची फेव्हरेट आहे. पण तिचा चित्रपटसृष्टीमधील प्रवास खूपच छोटा आहे. आयशाने करिअर यशाच्या शिखरावर असताना लग्न करून अभिनयाला अलविदा केला. मुंबईत रेस्टॉरंट चालवणाऱ्या फरहानसोबत तिने वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी लग्न केले. आयशाने २०१३ मध्ये एका मुलाला जन्म दिला आणि त्याचे नाव मिकेल ठेवले. आता आयशा आनंदाने जगत असल्याचे बोलले जात आहे.