Mission Impossible 8: इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अवनीत कौरने आज एक खास ओळख निर्माण केली आहे. अवनीतने लहान वयातच अभिनय विश्वात पाऊल ठेवले आणि आपले मोठे नाव कमावले. सोशल मीडियावरही अवनीतची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. सध्या अवनीत तिच्या एका मोठ्या प्रोजेक्टमुळे खूप चर्चेत आहे. हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझचा 'मिशन इम्पॉसिबल ८' हा सुपरहिट चित्रपट तिच्या हाती आला आहे. अवनीतने 'मिशन इम्पॉसिबल ८'च्या प्रीमियरमधील काही फोटो पोस्ट केले आहेत, जे आता वेगाने व्हायरल होत आहेत.
अवनीतने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझसोबतच्या एका खास भेटीचे काही फोटो पोस्ट केले आहेत. तर आता अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लेटेस्ट फोटोशूटची काही झलक दाखवली आहे, ज्यात तिच्यासोबत टॉम क्रूझ देखील दिसत आहे. टॉम क्रूझच्या आगामी 'मिशन : इम्पॉसिबल- द फायनल रेकनरिंग' या चित्रपटात ती झळकणार असल्याचे अवनीत कौरने आपल्या इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.
शुक्रवारी सकाळी अवनीत कौरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर खुलासा केला की, ती लंडनमध्ये मोस्ट अवेटेड चित्रपट 'मिशन: इम्पॉसिबल- द फायनल रेकनिंग'च्या प्रीमिअरला उपस्थित होती. अवनीतने प्रीमियरमधील काही फोटो देखील शेअर केले आहेत, ज्यात सुपरस्टार टॉम क्रूझचा समावेश आहे. अवनीतने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती प्रीमियरला पोहोचताच कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत होती. हे शेअर करताना तिने लिहिले की, "आज लंडनमध्ये @missionimpossible प्रीमियरमध्ये. "
केले टॉम क्रूझचे कौतुक
अवनीतने टॉम क्रूझसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने लिहिले की, "सर्वात प्रेमळ आणि सर्वात विनम्र". तिने असेही सांगितले की टॉमने तिला कार्पेटवर चालण्यास मदत केली कारण तिला तिच्या ड्रेसमध्ये त्रास होत होता. अवनीतने टॉमचे वर्णन "एक सच्चे जेंटलमन" असे केले. तिने पुढे लिहिले की, "जेव्हा जेव्हा मला तुमच्यासोबत भेटण्याची संधी मिळाली आहे टॉम, तुम्ही मला अक्षरशः खूप काही शिकवलं आहे! तुम्ही जसे आहात त्याबद्दल धन्यवाद."
संबंधित बातम्या