मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Avatar 2 Twitter Review: ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ची सोशल मीडियावरही धूम; चित्रपट पाहून प्रेक्षक म्हणतायत...

Avatar 2 Twitter Review: ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ची सोशल मीडियावरही धूम; चित्रपट पाहून प्रेक्षक म्हणतायत...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 16, 2022 04:12 PM IST

Avatar 2 Twitter Review: बॉक्स ऑफिस प्रमाणेच आता सोशल मीडियावर देखील ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे.

Avtar The Way Of Water
Avtar The Way Of Water

Avatar 2 Twitter Review: जेम्स कॅमेरून यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ अखेर आज (१६ डिसेंबर) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या रिलीज आधीच त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. ‘अवतार’ हा चित्रपट २००९मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता तब्बल १३ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर या चित्रपटाचा सिक्वेल रिलीज होतोय. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आपल्याला हा चित्रपट कसा वाटला हे नेटकरी ट्वीटच्या माध्यमातून सांगत आहेत.

‘अवतार द वे ऑफ वॉटर’ या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. 'अवतार: द वे ऑफ वॉटर’ या चित्रपटाची कथा तिथून सुरु होते, जिथे पहिल्या भागाची कथा संपते. आपला ग्रह आणि पेंडोरा दुनिया वाचवण्यासाठी सुरू असलेला संघर्ष या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पेंडोरा आणि या जादुई विश्वातील गंमती प्रेक्षकांना पुन्हा एकदा आवडल्या आहेत. चित्रपटात अत्याधुनिक VFX तंत्रज्ञानाचा वापर केल्याने चित्रपट अधिक प्रभावशाली झाला आहे. नेटकरी देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया देत आहे.

काहींनी ‘अप्रतिम’ या एका शब्दांत आपला रिव्ह्यू दिला आहे. तर, एका युझरने लिहिले की, ‘तुम्हाला माझा अवतार २ रिव्ह्यू हवा आहे? बरं, मी अगदी थोडक्यात आणि सोप्या शब्दात सांगेन. तुम्ही देखील हा चित्रपट अनुभवा! हा एक जादुई अनुभव आहे. मला वाटत की, बहुतेकांना पहिल्या भागापेक्षा या चित्रपटात जास्त मजा येईल. यात कमाल केली आहे. जेम्स कॅमेरून यांची अफलातून कलाकृती... मी सर्वांना ते थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची शिफारस करेन.’

तर, आणखी एका चाहत्याने लिहिले की, ‘मी आताच अवतार २ पाहिला. हा आतापर्यंतचा सगळ्यात भारी चित्रपट आहे. पहिल्या भागापेक्षा मला हा चित्रपट अधिक आवडला. ज्या प्रकारे या चित्रपटाची कथा पुढे सरकते आणि पहिल्या भागाशी कनेक्ट होते, ते खूप सुंदर आहे. या चित्रपटातील व्हीएफएक्स आणि सगळेच सीन खूप छान आहेत.

IPL_Entry_Point