ऑगस्ट महिन्यात ओटीटीवर काही रंजक चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत. आता या सीरिज आणि वेब सीरिज कोणते हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. चला पाहूया या चित्रपट आणि सीरिजची यादी…
विक्रांत मैसी, तापसी पन्नू आणि सनी कौशल महत्त्वाच्या भूमिकेत असणारा 'फिर आई हसीन दिलरुबा' हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
राघव जुयालची वेब सीरिज 'ग्यारह ग्यारह' ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. ही वेब सीरिज झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
कमल हासन यांची 'मनोरथंगल' ही वेब सीरिज १५ ऑगस्ट रोजी झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
लक्ष्य, राघव जुयाल आणि तान्या मानिकतला यांचा किल हा चित्रपट डिझ्स्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.