Atul Kulkarni: 'चांदनी बार' ते 'नटरंग', अष्टपैलू अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्याविषयी खास गोष्टी-atul kulkarni birthday special know about him in detail ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Atul Kulkarni: 'चांदनी बार' ते 'नटरंग', अष्टपैलू अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्याविषयी खास गोष्टी

Atul Kulkarni: 'चांदनी बार' ते 'नटरंग', अष्टपैलू अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्याविषयी खास गोष्टी

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 10, 2024 07:56 AM IST

Atul Kulkarni Birthday: हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते म्हणून अतुल कुलकर्णी ओळखले जातात. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी...

Atul Kulkarni
Atul Kulkarni

Happy Birthday Atul Kulkarni: आपल्या अभिनयाने केवळ मराठीच नाही तर हिंदी, तमिळ, तेलुगु आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे अतुल कुलकर्णी. त्याने अभिनयासोबतच अनेक चित्रपटांचे लेखन केले आहे. त्याच्या प्रत्येक प्रोजेक्टला एक वेगळी ओळख मिळाली. तसेच त्याने अनेक नाटकांमध्येही काम केले आहे. प्रेक्षकांच्या मनात घर करण्यास तो यशस्वी ठरला. आज १० सप्टेंबर रोजी अतुलचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी...

कर्नाटकात झाला जन्म

अतुल कुलकर्णी यांचा जन्म १० सप्टेंबर १९६५ कर्नाटकात झाल होता. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण देखील कर्नाटकातून पूर्ण केले. लहानपणासून अभिनयाचं वे असणाऱ्या अतुल कुलकर्णी यांनी दहावीत असताना पहिल्यांदा त्यांच्या शाळेत अभिनय केला. यानंतर त्यांचा हा प्रवास जोरदार सुरू झाला. शाळेपासून ते कॉलेजपर्यंत अतुल कुलकर्णी अनेक नाट्यगटांमध्ये सामील झाले. त्यांनी खूप मेहनतीने अभिनयाचे बारकावे शिकून घेतले होते.

अतुल कुलर्णीचा पहिला सिनेमा

अतुल कुलकर्णी यांनी केवळ मराठीच नव्हे तर , हिंदी, कन्नड, मल्याळम, तामिळ आणि तेलुगु चित्रपटांमध्येही लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. या दरम्यान, त्यांनी १९९५मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचा डिप्लोमा केला. त्यानंतर ते पूर्णपणे चित्रपटांकडे वळले. ‘भूमि गीता’ या चित्रपटातून अतुल कुलकर्णी यांनी बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले. यानंतर, अतुल कुलकर्णी यांनी प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली.

मधुर भांडारकरने दिली संधी

एकापेक्षा एक दमदार चित्रपट करत असतानाच, अतुल कुलकर्णी यांना मधुर भांडारकर ‘चांदनी बार’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाने अतुल यांना प्रचंड यश मिळवून दिले. या चित्रपटात अतुल कुलकर्णी यांनी साकारलेले पात्र खूप प्रसिद्ध झाले होते. अभिनेत्री तब्बू हिने या चित्रपटात मुख्य नायिका होती. या चित्रपटाची कथा देखील तब्बूभोवती फिरणारीच होती. पण, तरीही अतुल कुलकर्णी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरले.
वाचा: गर्लफ्रेंडला सिद्धीविनायक मंदिरात घेऊन जायचा अन्…; अक्षय कुमारची डेटिंग ट्रीक माहितीये का?

नटरंग सिनेमाने करिअरला वेगळ्या वळणावर आणले

‘चांदनी बार’ या चित्रपटाव्यतिरिक्त अतुल कुलकर्णी यांनी ‘रंग दे बसंती’ आणि ‘द अटॅक्स ऑफ २६/११’ मध्ये देखील दमदार अभिनय केला आहे. या चित्रपटांमधून अतुल यांनी केवळ प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत, तर ते समीक्षकांचे देखील आवडते बनले. यानंतर अतुल कुलकर्णी यांनी ‘नटरंग’ हा चित्रपट केला. हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला. कुटुंब, मित्र आणि समाजाशी संबंधित अनेक समस्यांना तोंड देत पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाची कथा या चित्रपटात दाखवली गेली आहे. लिंगभेदासारखे मुद्देही या चित्रपटात ठळकपणे मांडण्यात आले आहेत. मुख्य आणि सहाय्यक पात्राबरोबरच अतुल कुलकर्णी यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिकाही खूप गाजल्या.

Whats_app_banner
विभाग