गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य दिग्दर्शक अटली चर्चेत आहे. कारण, त्याचा प्रत्येक सिनेमा हा हिट होताना दिसत आहे. त्यामध्ये जवान, उस्ताद भगत सिंग, थेरी, मार्शल अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. आता अटीलाच आणखी एक बॉलिवूड सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्याचे नाव 'बेबी जॉन' असे आहे. या चित्रपटात अभिनेता वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अटली आणि त्यांची संपूर्ण टीम सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. दरम्यान, अटलीने त्याचे सर्व सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरण्यामागचे कारण देखील सांगितले आहे.
अटलीने काही मोजकेच सिनेमे केले आहेत. त्याच्या सर्वच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या यशामागचे कारण म्हणजे रिस्क घेणे आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणे असे स्वत: अटलीने म्हटले आहे. या दोन गोष्टींमुळे अटलीला यश मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच प्रत्येक कलाकाराचा विश्वास आहे असे देखील अटलीने सांगितले.
जवान सिनेमाविषयी बोलताना अटली म्हणाला की, 'जेव्हा मी शाहरुख सरांना जवानची ऑफर दिली तेव्हा सांगितले पहिले तुम्ही थोडे थांबा आणि पाहा, विक्रम राठोर हे एक अतिशय लोकप्रिय कॅरेक्टर होणार आहे. त्याने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, नाही अटली. मुलींना मी आवडतो. त्यावर मी उत्तर दिले, सर मी शर्यत लावतो. हे पात्र चर्चेत येणार. सिनेमा पूर्ण झाला. तो पाहिल्यावर त्यांनी मला सांगितले की मी बरोबर होतो.' शाहरुखनच्या जवान चित्रपटातील भूमिकेची विशेष चर्चा रंगली होती. प्रेक्षकांना हे पात्र, प्रचंड आवडले होते.
त्यानंतर दिग्दर्शकाने 'मास' या शब्दाचा आपल्यासाठी काय अर्थ आहे यावर भाष्य केले. 'जेव्हा तुमचे एखादे पात्र मुलीसाठी भांडते, एखाद्या प्रेम भावनेसाठी भांडते, बाळासाठी भांडते तेव्हा ते प्रसिद्ध होते. हे पात्र एखाद्या आईसारखी भूमिका साकारते. जेव्हा तुम्ही खरोखरच समाजासाठी उभे राहता, तेव्हा ते सामूहिक असते. त्याखेरीज लोकांना जे पात्र आवडते, पटते ते चर्चेत येते. माझ्या चित्रपटांच्या यशाचा हात खरा मंत्र आहे. म्हणूनच माझे चित्रपट बॉक्स ऑफिसवर (पैसे) कमवत आहेत. हाच माझा तारक मंत्र आहे.'
वाचा: दादा कोंडकेंना ‘सासरचं धोतर’ या सिनेमाची कशी सुचली कथा? वाचा भन्नाट किस्सा
वरुण धवनची प्रमुख भूमिका असलेला 'बेबी जॉन' हा चित्रपट येत्या २५ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. लगेच अॅटली त्याच्या पुढील चित्रपटाची घोषणा करण्याच्या तयारीत आहे. सध्या एआर मुरुगदास सोबत काम करणाऱ्या सलमान खानने दिग्दर्शकाच्या एका प्रोजेक्टसाठी होकार दिल्याची चर्चा आहे. विजय सेतुपतीसोबत एक तामिळ चित्रपट आहे याचीही त्याने पुष्टी केली.
संबंधित बातम्या