मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ही तर सेम राहा सारखी दिसते; अतिफ अस्लमच्या मुलीचा फोटो पाहून नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

ही तर सेम राहा सारखी दिसते; अतिफ अस्लमच्या मुलीचा फोटो पाहून नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 25, 2024 08:22 AM IST

प्रसिद्ध गायक अतिफ अस्लमने सोशल मीडियावर त्याच्या लेकीचा फोटो शेअर केला होता. हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ही तर सेम राहा सारखी दिसते; अतिफ अस्लमच्या मुलीचा फोटो पाहून नेटकऱ्यांची प्रतिक्रिया
ही तर सेम राहा सारखी दिसते; अतिफ अस्लमच्या मुलीचा फोटो पाहून नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

चाहत्यांना स्टारकिड्सविषयी जाणून घेण्यास जास्त रस असल्याचे कायमच पाहायला मिळाले. मग ते मोठे स्टारकिड्स असो वा छोटे असो. सर्वजण त्यांच्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक असतात. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची मुलगी, बिपाशा बासूची मुलगी, अजय देवगणचा मुलगा, अनुष्का शर्माची मुलगी या सगळ्यांच्या झलक पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. काही दिवसांपूर्वीच आलिया आणि रणबीरने राहाला मीडियासमोर आणले. त्यानंतर आता प्रसिद्ध गायकाने त्याच्या मुलीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटोपाहून सर्वांना ती राहा की दुसरी कोण असा प्रश्न पडला आहे.

प्रसिद्ध गायक अतिफ अस्लमने लेकीच्या वाढदिवशी सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. पहिल्या फोटोमध्ये अतिफ मुलीसोबत खेळताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्याच्या मुलीचा क्यूट अंदाज दिसत आहे. हे फोटो शेअर करत अतिफने मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या मुलीचे नाव हलिमा असे आहे. सोशल मीडियावर अतिफच्या क्यूट मुलीचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.
वाचा: शरद पोक्षेंचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहण्यास नकार, काय आहे कारण?

नेटकऱ्यांनी अतिफच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने 'अगदी सेम सेम दिसतात. फक्त आई आणि वडील वेगळे आहे' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'अरे ही तर रहा सारखी दिसते' असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने 'बापरे दोघी जुळ्याची बहिणी असल्यासारखे वाटत आहे. खूप जवळपास सारख्याच दिसतात' अशी कमेंट केली आहे.
वाचा: 'या' कारणामुळे इम्रान हाश्मीने आलियासोबत किसिंग सीन देण्यास दिला होता नकार

आलियाने ६ नोव्हेंबर २०२२ रोजी राहाला जन्म दिला. जवळपास वर्षभरानंतर म्हणजे ख्रिसमला आलियाने राहाला सर्वांसमोर आणले. त्यानंतर राहाचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. अतिफ अस्लम २३ मार्च २०२३ रोजी बाबा झाला. त्याने मुलीच्या पहिल्या वाढदिवशी तिचा चेहरा सर्वांसमोर आणला.

IPL_Entry_Point