मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Atif Aslam : पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडचे दरवाजे पुन्हा उघडले! आतिफ अस्लमला पहिली संधी

Atif Aslam : पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडचे दरवाजे पुन्हा उघडले! आतिफ अस्लमला पहिली संधी

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 30, 2024 02:27 PM IST

Atif Aslam Come Back in Bollywood: जवळपास ७ ते ८ वर्षांनंतर अतिफ असलम बॉलिवूड चित्रपटाासाठी गाणे गाणार हे ऐकून चाहत्यांना आनंद झाला आहे. जाणून घेऊया कोणत्या चित्रपटाचे गाणे गाणार...

Atif Aslam
Atif Aslam

फिल्म इंडस्ट्रीमध्ये कायमच पाकिस्तानी कलाकार, गायकांना विरोध करण्यात आला आहे. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यावर विरोध दर्शवला होता. तसेच गायकांना देखील भारतीय गाणी करण्यासाठी विरोध करण्यात आला होता. अशातच पाकिस्तानी गायक अतिफ अस्लम पुन्हा बॉलिवूडमध्ये परतणार असल्याचे समोर आले आहे. जवळपास ७-८ वर्षांनंतर आतिफ बॉलिवूडमध्ये परतणार असल्यामुळे चाहते आनंदी झाले आहेत.

Boxofficeworldwide.comने दिलेल्या वृत्तानुसार, आतिफ अस्लम बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. तो संगिनी ब्रदर्स मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली बनवणाऱ्या चित्रपटातील गाणे गाणार आहे. या चित्रपटाचे नाव "स्टोरी ऑफ 90's" असे आहे. अध्यायन सुमन आणि मिस युनिव्हर्स दिवा दिविता राय या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे आतिफ असलमच्या आवाजातील गाणे ऐकण्यासाठी श्रोते आतुर झाले आहेत.
वाचा: पत्नीनं आयुष्य मिळवून दिलं अन् लेकीनं जीवन सुंदर केलं! वाढदिवशी श्रेयस तळपदे झाला भावूक

संगिनी ब्रदर्सने याबाबत दिली माहिती

समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमसोबत कोलॅब करत असल्याची माहिती संगिनी ब्रदर्सने दिली आहे. जवळपास ७ वर्षांनंतर तो बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण करणार आहे. तो 'LSO90' या चित्रपटातील गाणे गाणार आहे. संगिनी ब्रदर्सने याबाबत माहिती देत सांगितले की, "आतिफ अस्लमला त्यांच्या बॉलिवूड चित्रपटासाठी कास्ट करणे आव्हानात्मक होते. आतिफचे लक्ष चित्रपटाच्या कथेवर होते. त्याला चित्रपटाविषयीची सर्व माहिती सांगायची होती. आतिफला चित्रपटाची कथा खूप आवडली आणि त्याने चित्रपटात गाण्यासाठी होकार दिला."

ट्रेंडिंग न्यूज

चित्रपटासाठी अजून कोण गायक असणार?

LSO90 चित्रपटात आतिफ व्यतिरिक्त उदित नारायण आणि अमित मिश्रा हे गायक देखील गाणी गाणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी मोठी मेजवानी असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाचा: बॉबी देओलने शर्ट काढताच घाबरलो होतो; रणबीर कपूरने सांगितला किस्सा

आतिफ अस्लमची सुपरहिट गाणी कोणती?

आतिफ अस्लमने बॉलिवूडमधील अनेक हिट गाणी गायली आहेत. त्यामध्ये तू जाने ना, तेरा होने लगा हूं, तेरे संग यारा, दिल दियां गल्लां, तेरे बिन, वो लम्हे वो बातें, पिया ओ रे पिया या गाण्यांचा समावेश आहे. भारतात आतिफ अस्लमचा मोठा चाहता वर्ग आहे.

WhatsApp channel
विभाग