Jawan: चाहत्याने विचारलं ‘जवानमधून काय शिकवण मिळणार?’; शाहरुख खानचं उत्तर ऐकून तुम्हीही कराल कौतुक!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jawan: चाहत्याने विचारलं ‘जवानमधून काय शिकवण मिळणार?’; शाहरुख खानचं उत्तर ऐकून तुम्हीही कराल कौतुक!

Jawan: चाहत्याने विचारलं ‘जवानमधून काय शिकवण मिळणार?’; शाहरुख खानचं उत्तर ऐकून तुम्हीही कराल कौतुक!

Published Sep 04, 2023 09:38 AM IST

Ask SRK session Shah Rukh Khan: शाहरुख खानने नुकतंच ‘आस्क एसआरके’ सेशनमध्ये ‘जवान’ या चित्रपटाचं प्रमोशन केलं. यावेळी त्याने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

Ask SRK session Shah Rukh Khan
Ask SRK session Shah Rukh Khan

Ask SRK session Shah Rukh Khan: 'जवान' या बॉलिवूड चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख पुन्हा एकदा सोशल मीडियाचा चांगला वापर करताना दिसत आहे. शाहरुख खानने नुकतंच ‘आस्क एसआरके’ सेशनमध्ये ‘जवान’ या चित्रपटाचं प्रमोशन केलं. यावेळी त्याने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. पण, यासोबतच शाहरुखने चित्रपटाबद्दल एक मोठा खुलासाही केला आहे. या चित्रपटातून काय धडा शिकायला मिळणार, हे त्याने प्रेक्षकांना सांगितले आहे. एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला शाहरुख खानने सुंदर उत्तर दिले आहे. यावेळी त्याने या चित्रपटाचे सार एका ओळीत सांगितले आहे.

‘आस्क एसआरके’ सेशन दरम्यान एका चाहत्याने शाहरुख खानला सांगितले की, तो ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये आहे आणि तेथून या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणार आहे. या व्यक्तीने शाहरुख खानला विचारले की, या चित्रपटातून त्यांना काय शिकायला मिळणार?. यावर शाहरुख खाननेही त्या व्यक्तीला उत्तर देताना म्हटले की, ‘हा चित्रपट एक माणूस म्हणून आपण आपल्या सभोवतालच्या वातावरणात काय बदल घडवून आणत आहोत हे सांगतो. हा चित्रपट महिलांना खंबीर व्हायला आणि स्वतःसाठी लढायला शिकवतो.’

Rishi Kapoor Birth Anniversary: ऋषी कपूर यांच्या दमदार अभिनयाने सजलेले ‘हे’ चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

याशिवाय शाहरुख खानने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी एका चाहत्याने शाहरुख खानला विचारले की, किंग खान त्याच्या गर्लफ्रेंडला मोफत तिकीट मिळवून देऊ शकतो का? यावर शाहरुखनेही त्या व्यक्तीला त्याच्याच शैलीत उत्तर दिले. ‘मला फक्त प्रेम फुकट द्यायचे आहे. चित्रपट पाहण्यासाठी पैसे मोजावे लागतील’, असे विनोदी उत्तर शाहरुख खान याने दिले. अशा अनेक प्रश्नांना शाहरुखने यावेळी मजेशीर उत्तरे दिली.

‘जवान’ या चित्रपटात चाहत्यांना पहिल्यांदाच किंग खान याआधी कधीही न पाहिलेल्या भन्नाट स्टाईलमध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान पहिल्यांदाच पाच वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारणार आहे. चित्रपटात साऊथचे अनेक स्टार्सही दिसणार आहेत. दक्षिणेतील दिग्गज चित्रपट दिग्दर्शक ऍटली यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. ‘जवान’ हा चित्रपट ७ सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Whats_app_banner