मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Asin Birthday: 'गजनी'मधून गाजल्यानंतरही असिनने का ठोकला मनोरंजन विश्वाला रामराम?

Asin Birthday: 'गजनी'मधून गाजल्यानंतरही असिनने का ठोकला मनोरंजन विश्वाला रामराम?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Oct 26, 2023 10:15 AM IST

Happy Birthday Asin: साऊथमधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या असिनने बॉलिवूडमध्येही आपली जागा निर्माण केली होती.

Happy Birthday Asin
Happy Birthday Asin

Happy Birthday Asin: केवळ साऊथच नव्हे, तर आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूड विश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणून असिन हिचे नाव घेतले जाते. आज (२६ ऑक्टोबर) अभिनेत्री आपला ३८वा वाढदिवस साजरा करत आहे. साऊथमधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या असिनने बॉलिवूडमध्येही आपली जागा निर्माण केली होती. मात्र, अवघ्या एका चित्रपटानंतरच तिने मनोरंजन विश्व सोडण्याचा निर्णय घेतला होता. यामागे तिचे वैयक्तिक कारण असले, तरी तिच्या या निर्णयाने चाहत्यांना मात्र धक्का बसला होता. तिच्या अचानक निर्णयाने संपूर्ण चाहता वर्ग नाराज झाला होता.

ट्रेंडिंग न्यूज

असिनने मोठ्या पडद्यावर अनेक बड्या अभिनेत्यांसोबत रोमान्स केला होता. असिनचा जन्म २६ ऑक्टोबर १९८५मध्ये कोचीमध्ये झाला होता. ती मल्याळी कॅथलिक कुटुंबात जन्माला आली होती. असिनचे वडील सीबीआय अधिकारी होते. तर, तिची आई पेशाने सर्जन होती. असिन लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होती. तिला दहावीत ९० टक्के गुण मिळाले होते. तिने इंग्रजी साहित्यात कला शाखेची पदवी प्राप्त केली. असिनने २००१मध्ये एका मल्याळम चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.

Pooja Hegde: पूजा हेगडेने खरेदी केली महागडी कार; 'इतक्या' किंमतीत तुमचा आलिशान राजवाडा बनेल!

वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी तिने पहिल्या चित्रपटात काम केले होते. पहिल्याच चित्रपटातून असिनला भरपूर प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटाने असिनला फिल्मी दुनियेत पुढे जाण्यासाठी खूप मदत केली. अभिनेत्री असण्यासोबतच असिन एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना देखील आहे. याशिवाय तिला आठ भाषांचे ज्ञान आहे. २००१ नंतर ती अनेक साऊथ चित्रपटांमध्ये दिसली. तर, २००८मध्ये आलेल्या 'गजनी' चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. या चित्रपटात ती अभिनेता आमिर खानसोबत झळकली होती. त्यांचा हा चित्रपट तुफान गाजला होता. असिनची कारकीर्द यशाच्या शिखरावर असतानाच तिने लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला होता.

२०१६मध्ये अभिनेत्रीने बिझनेसमन राहुल शर्मासोबत लग्नगाठ बांधली होती. असिनचा पती राहुल शर्मा हा मायक्रोमॅक्सचा सह-मालक आहे. लग्नानंतर अवघ्या वर्षभरातच असिनने २०१७मध्ये अरिनला म्हणजेच मुलीला जन्म दिला. लग्न आणि मुलगी झाल्यानंतरच असिनने स्वतःला फिल्मी जगापासून दूर केले आणि आता ती आपल्या मुलीच्या संगोपनात वेळ घालवत आहे.

IPL_Entry_Point

विभाग