भारताने ८व्यांदा आशिया जिंकला आहे. फायनलमध्ये भारताने श्रीलंकचा १० विकेट्सने पराभव केला. आशिया कपच्या फायनलमध्ये मोहम्मद सिराजने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने अवघ्या २१ धावांत श्रीलंकेचे ६ फलंदाज बाद केले. या जोरावरच टीम इंडियाने श्रीलंकेला १५.२ षटकांत ५० धावांतच गारद केले. यानंतर धावांचा पाठलाग करताना अवघ्या ६.१ षटकात सामना जिंकला. मोहम्मद सिराजचा खेळ पाहून बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने नाराजी व्यक्त केली आहे.
भारताच्या या विजयावर सर्वजण खुश आहेत आणि सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. अडीच तास चाललेल्या या मॅचमध्ये मोहम्मद सिराजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी त्याच्यासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली. श्रद्धा कपूरने मात्र तिच्या इन्स्टा स्टोरीवर पोस्ट लिहित सिराजवर नाराजी व्यक्त केली. सिराजमुळे रविवारचा दिवस वाया गेला असे तिने अप्रत्यक्षपणे म्हटले आहे.
वाचा: "आमच्या पप्पांनी श्रीलंकेला हाणला", सामना जिंकताच मराठमोळ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल
श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि टोपी घातली आहे. तसेच ती कारमध्ये बसली आहे. या फोटोवर ‘आता सिराजलाच विचारा की या मोकळ्या वेळेत काय करावे?’ असे लिहिले होते. खरंतर श्रद्धाचा रविवाराचा प्लान हा उशिरापर्यंत मॅच पाहण्याचा होता. पण सामना अडीच तासातच संपला. कारण ५१ धावांचे लक्ष होते. त्यामुळे आता उरलेल्या वेळात काय करायचे असा प्रश्न तिला पडला.
आशिया कपच्या फायनलमध्ये २९ वर्षीय सिराजने एकाच षटकात ४ विकेट घेतल्या. या सामन्यात त्याने ७ षटकांत २१ धावा देऊन ६ बळी घेतले. सिराजने ५ विकेट घेण्यासाठी केवळ १६ चेंडू घेतले. त्याने चमिंडा वासची बरोबरी केली. २००३ च्या विश्वचषकात श्रीलंकेच्या चामिंडा वासनेही अशी कामगिरी केली होती. सामन्यानंतर मोहम्मद सिराज त्याच्या कामगिरीवर खूप खूश दिसत होता.
संबंधित बातम्या