Ashutosh Gowariker: कतारला जाण्यासाठी जितेंद्र जोशीला आशुतोष गोवारीकरांनी केली होती मोठी मदत, नेमकं काय जाणून घ्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ashutosh Gowariker: कतारला जाण्यासाठी जितेंद्र जोशीला आशुतोष गोवारीकरांनी केली होती मोठी मदत, नेमकं काय जाणून घ्या

Ashutosh Gowariker: कतारला जाण्यासाठी जितेंद्र जोशीला आशुतोष गोवारीकरांनी केली होती मोठी मदत, नेमकं काय जाणून घ्या

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Feb 15, 2024 07:59 AM IST

Ashutosh Gowariker Birthday: आज १५ फेब्रुवारी रोजी आशुतोष गोवारीकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या विषयी काही खास गोष्टी...

Bollywood film director Ashutosh Gowariker (Photo by Sujit JAISWAL / AFP)
Bollywood film director Ashutosh Gowariker (Photo by Sujit JAISWAL / AFP) (AFP)

Ashutosh Gowariker Marathi Movie: बॉलिवूडमधील अतिशय हिट चित्रपट देणारे दिग्दर्शिक म्हणून आशुतोष गोवारीकर ओळखले जातात. त्यांनी 'लगान', 'स्वदेस', 'जोधा अकबर' अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केले. काही कलाकारांचे रातोरात आयुष्य बदलले. आज १५ फेब्रुवारी त्यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांचा मराठी चित्रपट करतानाचा एक किस्सा आपण जाणून घेणार आहोत.

आशुतोष यांनी प्रियांका चोप्रानं निर्मिती केलेल्या व्हेंटिलेटर या मराठी चित्रपटात भूमिका साकारली होती. जवळपास १८ वर्षांनंतर आशुतोष गोवारीकर हे मराठी चित्रपटासाठी काम करत होते. या चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशी महत्त्वाच्या भूमिकेत होता. जितेंद्रने आशुतोष यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव सांगितला होता. हा सेटवरचा किस्सा होता.
वाचा: पहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंत सध्या काय करतो? काय आहे कमाईचा स्त्रोत?

"मला एका कामासाठी कतारला जायचे होते आणि त्याचवेळी 'व्हेंटिलेटर' चित्रपटाचे चित्रीकरण करत होतो. हे चित्रीकरण कुर्ल्यात सुरु होते. त्याचदिवशी गोवारीकर यांना जुहूलामध्ये एका मीटिंगसाठी जायचे होते. त्यांचे काही सीन शूट व्हायचे होते. 'सकाळी सात ते अकरा मी शूटिंग करतो. मग लगेच जुहूला जाऊन दुपारी तीनपर्यंत पोहोचतो' असे ते म्हणाले होते. पण हे शक्य नाही. कारण बाकी सीन चित्रीत करून जितेंद्रला पाच वाजताची फ्लाइट पकडायची आहे, असे दिग्दर्शक मापुस्कर यांनी सांगितले. मी वेळेत पोहोचतो असे सांगून ते मीटिंगला गेले आणि दिलेल्या वेळेत परत आले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा मेकअप आणि कपडे तसेच होते. मला निघायचे असल्याने, पुन्हा मेकअपमध्ये वगैरे वेळ वाया जाऊ नये म्हणून त्यांनी तो तसाच ठेवला होता', असे जितेंद्र म्हणाला.

पुढे तो म्हणाली की, 'आशुतोष हे त्यांच्या कामाच्या बाबतील नेहमी चोख असतात. प्रत्येकवेळी आपल्या कामातून काहीतरी नवीन द्यायचा त्यांचा प्रयत्न असतो. दिग्दर्शक म्हणून त्यांनी खूप चांगले चित्रपट दिले आहेत.'

Whats_app_banner