राजकारण आणि सिनेमा प्रत्यक्ष यांचा जरी काही संबंध नसला तरी अनेक कलाकार कधी राजकारणात नशीब अजमावतना दिसतात तर कधी राजकीय नेतेच चित्रपट सिनेमांमध्ये अभिनय करताना दिसतात. अगदी हल्लीचच उदाहरण द्यायचं झाला तर रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले आणि स्वयंभिमान शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी 'राष्ट्र' या सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसले होते. अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत एका चित्रपटात महिला खासदाराने भूमिका साकारली होती. आता ही अभिनेत्री कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
अभिनेते दादा कोंडकेंच्या 'ह्योच नवरा हवा' या चित्रपटात शिवसेना नेते प्रमोद नवलकर यांनी अभिनयाची हौस भागवून घेतली होती. मात्र आज आपण अशा एका महिला खासदाराबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी एका चित्रपटात चक्क अशोक सराफ यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. प्रश्न पडला ना कोण आहे ही महिला नेता? तुम्ही १९९४ साली रिलीज झालेला अशोक सराफ यांचा 'भस्म' हा चित्रपट पाहिलं आहे का? या चित्रपटात अशोक सराफ यांची मुलगी दुर्गी हि भूमिका साकारणाऱ्या मुलीला एकदा नीट पहा.. ओळखलत का कोण आहे ही? नाही ना...
अशोक सराफ यांच्यासोबत दिसणारी ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून भाजपचे फायरब्रॅन्ड नेते प्रमोद महाजन यांची सुकन्या पूनम महाजन आहेत. पूनम यांनी या चित्रपटात अशोक सराफ यांच्या मोठ्या मुलीची भूमिका साकारली होती. मात्र पूनम यांची निवड प्रमोद महाजन यांची मुलगी म्हणून झाली असा जर तुमचा समज असेल तर तसे अजिबात नाही.
पूनम महाजन या बालमोहन विद्यामंदिर या शाळेतल्या विद्यार्थिनी आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे त्यावेळी या चित्रपटात अशोक सराफ यांच्या ३ मुलांच्या भूमीकेसाठी कलाकार शोधत होते. तेव्हा बालनाट्य चळवळीत काम करणाऱ्या अभिनेत्री दिग्दर्शिका विद्या पटवर्धन यांनी बालमोहन विद्यामंदिर शाळेतल्या ३ मुलांची या भूमिकांसाठी निवड केली. त्यात एक पूनम महाजन देखील होत्या. पूनम यांनी वयात आलेल्या एक मुलीची भूमिका या चित्रपटात केली होती. पूनम यांनी या चित्रपटात इतका सुंदर अभिनय केला होता कि अशोक सराफ यांनी देखील त्यांच्या अभिनयाचं कौतुक केलं होत. चित्रपटाचा विषय आणि अनेक अडीअडचनीमुळे हा चित्रपट थिएटरमधे काही रिलीज होऊ शकला नाही.
वाचा: नगरसेवकाने फसवून केले होते ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीशी लग्न, पहिल्या पत्नीने समोर आणले सत्य
पूनम महाजन यांनी पुढे जाऊन राजकारणात प्रवेश केला. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या असलेल्या पूनम यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामधून काँग्रेसच्या विद्यमान खासदार प्रिया दत्त यांचा १ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला.
संबंधित बातम्या