Lifeline Teaser: जे ज्ञान समाजाच्या उपयोगी नाही, ते व्यर्थ आहे; 'लाईफलाईन'चा उत्कंठावर्धक टीझर प्रदर्शित
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Lifeline Teaser: जे ज्ञान समाजाच्या उपयोगी नाही, ते व्यर्थ आहे; 'लाईफलाईन'चा उत्कंठावर्धक टीझर प्रदर्शित

Lifeline Teaser: जे ज्ञान समाजाच्या उपयोगी नाही, ते व्यर्थ आहे; 'लाईफलाईन'चा उत्कंठावर्धक टीझर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Updated Jul 15, 2024 01:47 PM IST

Lifeline Teaser: गेल्या काही दिवसांपासून अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर महत्त्वाच्या भूमिकेत असणारे 'लाईफलाईन' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Lifeline Teaser
Lifeline Teaser

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणून अशोक सराफ हे ओळखले जातात. आपल्या अभिनयातून प्रेक्षकाना खळखळून हसायला भाग पाडणाऱ्या अशोक सराफ यांचा एक वेगळा चित्रपट 'लाईफलाईन' लवकरच प्रदर्शित होणार आहे. आधुनिक विज्ञान आणि परंपरा यांच्यातील संघर्षावर भाष्य करणारा 'लाईफलाईन' या चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

काय आहे टीझर

'लाईफलाईन' या चित्रपटाच्या ४० सेकंदाच्या टीझरमध्ये अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अशोक सराफ हे एक डॉक्टर आहेत. तर माधव अभ्यंकर हे का खंबीर किरवंताची भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्यामुळे तंत्रज्ञान आणि रुढी परंपरा यांच्यामधील संघर्ष चित्रपटात पाहायला मिळणार आहे. एकंदरीत चित्रपटाचा टीझर हा सर्वांना आवडत आहे.

काय आहे चित्रपटाची कथा?

विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या रितीरिवाजांमधील संघर्ष यावर आधारित या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता चित्रपटाच्या टीझरने आणखीच उत्सुकता वाढली आहे.

कोणते कलाकार दिसणार?

महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त अभिनेते अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांची प्रमुख भूमिका असणारा 'लाईफलाईन' चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोन कलाकारांसोबत हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते आहेत.
वाचा: दीपिका पादूकोणला मिठी मारताच ऐश्वर्याचे डोळे का पाणावले? नेमकं काय झालय?

दिग्दर्शकाने सांगितले चित्रपटाविषयी

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक साहिल शिरवईकर म्हणतात, "आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आता या जुगलबंदीत कोण जिंकणार, हे चित्रपट पाहूनच कळेल. अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांसारखे दिग्गज या चित्रपटाला लाभले आहेत. त्यांनी हा विषय आपल्या जबरदस्त अभिनयाने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे. ‘लाईफलाईन’ हा एक कौटुंबिक चित्रपट असून मराठी सिने-सृष्टीतील दर्जेदार चित्रपटांच्या यादीत ओळखला जाईल याची मला खात्री आहे.''

Whats_app_banner