मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ashok Saraf: अशोक सराफ यांचा अनोखा लूक, 'लाईफलाईन' सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

Ashok Saraf: अशोक सराफ यांचा अनोखा लूक, 'लाईफलाईन' सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 01, 2024 12:57 PM IST

Ashok Saraf upcoming movie: अभिनेते अशोक सराफ यांचा प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांसाठी पर्वणी असतो. आता एका वेगळ्या विषयावर आधारित चित्रपट घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांच्या या चित्रपटाचे नाव 'लाईफलाईन' असे आहे.

Ashok Saraf : 'लाईफलाईन' सिनेमाचे पोस्टर
Ashok Saraf : 'लाईफलाईन' सिनेमाचे पोस्टर

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणून अशोक सराफ हे ओळखले जातात. आपल्या अभिनयातून प्रेक्षकाना खळखळून हसायला भाग पाडणाऱ्या अशोक सराफ यांचा एक वेगळा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरवरील अशोक सराफ यांचा लूक पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे.

जुने रीतिरिवाज आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील संघर्षावर आधारित 'लाईफलाईन' हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच प्रदर्शित झालेले चित्रपटाचे पोस्टर बघून अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर या दिग्गजांमधील संघर्षमय जुगलबंदी पाहाण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. या चित्रपटात महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त महानायक अशोक सराफ एका प्रख्यात डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधत मुंबईत साजऱ्या करण्यात आलेल्या ‘डॉक्टर्स डे सेलिब्रेशन’ या कार्यक्रमात अशोक सराफ यांच्या ‘लाईफलाईन’ चित्रपटातील व्यक्तिरेखेच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
वाचा: 'जुनं फर्निचर' सिनेमा घरबसल्या पाहायचाय? मग ही बातमी नक्की वाचा

कसा आहे अशोक सराफ यांचा लूक

‘लाईफलाईन’ या चित्रपटाच्या मोशन पोस्टरवर अशोक सराफ हे पांढरे एप्रन घालून, गळ्यात टेथास्कोप घालून उभे असल्याचे दिसत आहेत. तसेच 'आयुष्याचा प्रवास संपतो तेव्हा एका नवीन आयुष्याचा प्रवास सुरु होता याची तुम्हाला जाणीव करुन देण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत' असा आवाज पोस्टरच्या बॅकग्राऊंडमधून ऐकू येत आहे.
वाचा: तंत्रज्ञानाच्या मदतीने कुटुंबाला वाचवणारी 'गूगल आई', पाहा उत्सुकता वाढवणारा टीझर

ट्रेंडिंग न्यूज

काय आहे चित्रपटाची कथा?

विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या रितीरिवाजांमधील संघर्ष यावर आधारित या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाचा: अस्सल मातीतील कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीचा थरार; 'रांगडा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

कोणते कलाकार दिसणार?

‘लाईफलाईन’ या चित्रपटात अशोक सराफ, माधव अभ्यंकर, हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

WhatsApp channel