Ashok Saraf: ‘कल्पना नव्हती पण...’; ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या घोषणेनंतर अशोक सराफ यांनी व्यक्त केला आनंद!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ashok Saraf: ‘कल्पना नव्हती पण...’; ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या घोषणेनंतर अशोक सराफ यांनी व्यक्त केला आनंद!

Ashok Saraf: ‘कल्पना नव्हती पण...’; ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या घोषणेनंतर अशोक सराफ यांनी व्यक्त केला आनंद!

Jan 30, 2024 08:27 PM IST

Ashok Saraf Reaction On Maharashtra Bhushan Purskar: ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२३’ची घोषणा झाल्यानंतर अभिनेते अशोक सराफ यांनी आनंद व्यक्त केला.

Ashok Saraf Reaction On Maharashtra Bhushan Purskar
Ashok Saraf Reaction On Maharashtra Bhushan Purskar

Ashok Saraf Reaction On Maharashtra Bhushan Purskar: नुकतीच राज्य सरकारने ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२३’ची घोषणा केली. यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२३’ ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे. मनोरंजन विश्वातील अमुल्य योगदानासाठी त्यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२३’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. आता अशोक सराफ यांनी देखील आपला आनंद व्यक्त करत, पुरस्कारावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आता अशोक सराफ यांनी माध्यमांकडे आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२३’ची घोषणा झाल्यानंतर अभिनेते अशोक सराफ यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले की, ‘मला आता थोड्या वेळापूर्वीच कळलं की, यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मला जाहीर झाला आहे. खरं सांगू तर, मला हा पुरस्कार मिळेल याची खरंच कल्पना नव्हती. मी चांगलं काम करतोय, तुम्हाला माझं काम आवडतंय, हीच माझ्यासाठी खूप आनंद देणारी गोष्ट आहे. या पुरस्कारामुळे माझी आतापर्यंतची हे धडपड अखेर सार्थकी लागली, असं वाटतंय. मी साकारलेल्या भूमिका आणि माझं सगळं काम प्रेक्षकांना आवडलं पाहिजे, नेहमीच हाच माझा हेतू असतो. मायबाप प्रेक्षक असतील, तरच मी आहे. या प्रवासात ज्यांनी मला आतापर्यंत साथ दिली, मदत केली, त्या प्रत्येकाचेच मी आभार मानतो. याप्रसंगी निवेदिताचे देखील आभार मानावे वाटतात.’

Ashok Saraf : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर!

नुकतीच महाराष्ट्र भूषण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अशोक सराफ यांना पुरस्कार जाहीर करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिले की, ‘ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले.’

अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे, तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले, असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे. मराठी मनोरंजन विश्वासोबतच हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते अशोक सराफ यांना ‘अभिनय सम्राट’ म्हटले जाते. मराठी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या अशोक सराफ यांनी तब्बल २५०हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Whats_app_banner