Ashok Saraf : 'अशोक मा.मा.' मालिकेत दिसणार बिग बॉस मराठीमधील ही अभिनेत्री, नव्या प्रोमोने वेधले लक्ष
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ashok Saraf : 'अशोक मा.मा.' मालिकेत दिसणार बिग बॉस मराठीमधील ही अभिनेत्री, नव्या प्रोमोने वेधले लक्ष

Ashok Saraf : 'अशोक मा.मा.' मालिकेत दिसणार बिग बॉस मराठीमधील ही अभिनेत्री, नव्या प्रोमोने वेधले लक्ष

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 07, 2024 02:57 PM IST

Ashok Saraf New Serial : कलर्स मराठी वाहिनीवर एक नवी मालिका सुरु आहे. या मालिकेचे नाव 'अशोक मा.मा.' असे असून या मालिकेत बिग बॉस मराठी मधील अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Ashok Ma Ma
Ashok Ma Ma

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण करणारे, विनोदी अभिनेते म्हणजे अशोक सराफ मालिका विश्वात कमबॅक करत आहेत. आपल्या अभिनयातून प्रेक्षकाना खळखळून हसायला भाग पाडणाऱ्या अशोक सराफ यांच्या या मालिकेविषयी उत्सुकता पाहायला मिळते. त्यांची 'अशोक मा.मा.' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या मालिकेत त्यांच्यासोबत कोणती अभिनेत्री दिसणार हे स्पष्ट झाले आहे. सोशल मीडियावर एक नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

काय आहे मालिकेची कथा?

शिस्तीचं पालन करणारे, काटकसरीचा स्वभाव असणारे, स्वत:च्या निर्णयांवर ठाम असणारे 'अशोक मा.मा.' म्हणजेच अशोक माधव माजगावकर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. बत्तीस वेळा काम सोडून गेलेली मोलकरीण तेहतीसव्यावेळी पुन्हा कामावर येते. त्यावेळी काटकसरी स्वभाव असलेले अशोक मा.मा. मोलकरीन थोडं जास्त वापरत असलेल्या तेलावरून, साबणावरून तिच्यासोबत वाद घालतात. त्यांच्यातला हा वादाचा गमतीशीर प्रसंग प्रेक्षकांची मात्र उत्कंठा वाढवतोय.

मालिकेत दिसणार बिग बॉस मराठीमधील अभिनेत्री

कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'अशोक मा.मा.' मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अशोक माधव माजगावकर हे मोलकरणीशी भांडताना दिसत आहेत. या मोलकरणीची भूमिका 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री नेहा शितोळे साकारणार आहे. ती या मालिकेत अशोक मामांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. तिने वठवलेली मोलकरीण चांगलाच भाव खाऊन जातेय.

'अशोक मा.मा' या मालिकेच्या माध्यमातून एक आगळीवेगळी कथा घेऊन टेलिव्हिजनचा पडदा व्यापून टाकायला महाराष्ट्राचे लाडके अशोक मामा सज्ज आहेत. शिस्तप्रिय असणारे 'अशोक मा.मा.' आपल्या मिश्कील अंदाजाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद आणणार ऐवढं मात्र नक्की.. 'अशोक मा.मा' या मालिकेचा नवा प्रोमो समोर आल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
वाचा: बॉलिवूडमध्ये १९८०साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमामुळे झाले होते रेल्वेचे नुकसान, चित्रपटही ठरला फ्लॉप

टन टना टना मालिकेनंतर अशोक सराफ यांची नवी मालिका

'अशोक मा.मा.' मालिकेबद्दल बोलताना अशोक मामा म्हणाले, "मालिका खूपच मनोरंजक आहे. चिन्मय मांडलेकरने या मालिकेची कथा खूप चांगल्या पद्धतीने लिहिली आहे. 'टन टना टन' या मालिकेनंतर अनेक वर्षांनी पुन्हा 'कलर्स मराठी' वाहिनीच्या माध्यमातून मी टेलिव्हिजनवर कमबॅक करतोय. शूटिंग करताना खूप मजा येतेय. प्रेक्षकांनाही ही मालिका नक्कीच आवडेल".

Whats_app_banner