Ashok Saraf Favourite Serial: अभिनेते अशोक सराफ यांची आवडती मालिका कोणती? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ashok Saraf Favourite Serial: अभिनेते अशोक सराफ यांची आवडती मालिका कोणती? जाणून घ्या

Ashok Saraf Favourite Serial: अभिनेते अशोक सराफ यांची आवडती मालिका कोणती? जाणून घ्या

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 11, 2024 07:56 AM IST

Ashok Saraf Favourite Serial: अभिनेते अशोक सराफ हे दररोज न चुकता एक मालिका पाहातात. आता ही मालिका कोणती? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

Ashok Saraf
Ashok Saraf

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण करणारे, विनोदी अभिनेते म्हणजे अशोक सराफ. आपल्या अभिनयातून प्रेक्षकाना खळखळून हसायला भाग पाडणाऱ्या अशोक सराफ यांचा चाहता वर्ग मोठा आहे. सतत त्यांच्या विषयी किंवा त्यांच्या आगामी प्रोजेक्ट विषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. आता अशोक मामा हे दररोज एक मालिका पाहात असल्याची माहिती समोर आली आहे. ही मालिका कोणती? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

मराठमोळी अभिनेत्री रसिका वाखरकरने एक अनुभव शेअर केला आहे. त्यामध्ये तिने अशोक सराफ रोज न चुकता आपली मालिका पाहतात, यामुळे होणारा आनंद व्यक्त केला आहे. रसिकाने सोशल मीडियावर अशोक मामांसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मामा आणि निवेदिता सराफ देखील दिसत आहेत. त्याचप्रमाणे मालिकेतील अभिनेता इंद्रनील कामत तिच्यासोबत आहे. ही मालिका दुसरी तिसरी कोणती नसून कलर्स मराठी वाहिनीवरील पिरतीचा वणवा उरी पेटला ही मालिका आहे. अशोक सराफ ही मालिका दररोज पाहातात.
वाचा: कार्टून नेटवर्क बंद होणार? सोशल मीडियावरील या ट्रेंडमागचे सत्य काय?

काय आहे अभिनेत्रीची पोस्ट?

रसिका वाखरकरने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर अशोक सराफ यांच्या सोबतचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने, "मी कधीच सीरियल पाहत नाही.. पण तुमची सीरियल मी न चुकता रोज बघतो - अशोक सराफ.... बास काय हवंय अजून? काल त्यांना पहिल्यांदा भेटण्याचा, त्यांच्याशी गप्पा मारण्याचा आणि इतकंच नाही तर त्यांच्यासोबत आमच्या मालिकेचा एपिसोड बघण्याचा योग आला. अविस्मरणीय दिवस!" असे कॅप्शन दिले आहे.
वाचा: फास घेण्याची धमकी देत मराठी निर्माता शिवाजी पार्कात चढला झाडावर, काय आहे प्रकरण?

मालिकेविषयी जाणून घ्या

पिरतीचा वणवा उरी पेटला ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर प्रदर्शित होत आहे. ही मालिका दररोज रात्री १० वाजता प्रदर्शित होते. या मालिकेत रसिका वाखरकर आणि इंद्रनील कामत हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.
वाचा: सत्यात न्याय मिळवून देणारे नाहीत; ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणावर उत्कर्ष शिंदेची संतप्त पोस्ट

अशोक सराफ यांच्या कामाविषयी

अशोक सराफ यांचा 'लाइफलाइन' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यासोबतच त्यांचा ‘नवरा माझा नवसाचा २’ देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोन्ही चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.

Whats_app_banner