मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ashok Saraf: अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर पुन्हा एकत्र, येणार 'या' सुपरहिट सिनेमाचा दुसरा भाग

Ashok Saraf: अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर पुन्हा एकत्र, येणार 'या' सुपरहिट सिनेमाचा दुसरा भाग

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 05, 2024 08:20 AM IST

Navra Mazha Navsacha 2 : अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेता सचिन पिळगावकर यांचा 'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येत असल्यामुळे चाहत्यांना आनंद झाला आहे.

Navra Mazha Navsacha 2
Navra Mazha Navsacha 2

मराठी चित्रपटसृष्टीमधील असे काही चित्रपट जे प्रदर्शित होऊन बरीच वर्षे उलटली असली तरी आजही प्रेक्षक ते घरबसल्या पाहाताना दिसतात. या यादीमधील एक चित्रपट म्हणजे 'नवरा माझा नवसाचा.' या चित्रपटाने एकेकाळी अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेता सचिन पिळगावकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. आता जवळपास २० वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'नवरा माझा नवसाचा २'च्या शूटिंगला सुरुवात

ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी 'नवरा माझा नवसाचा २' चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करणाच असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. "'नवरा माझा नवसाचा २'शुटिंगला उद्यापासून सुरुवात.. तुमचे आशीर्वाद असेच राहुद्या" या आशयाचे कॅप्शन त्यांनी सोशल मीडियावर दिले आहे.
वाचा: सेलिब्रिटी परदेशात लग्न का करतात? राहत फतेह अली खानने सांगितले कारण

सोशल मीडियावर जयवंत वाडकर यांच्या 'नवरा माझा नवसाचा २' चित्रपटाची पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. एका यूजरने 'चित्रपटात आम्हाला ओरिजनल स्टारकास्ट हवी' अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एका यूजरने 'प्रदीप पटवर्धन यांची आठवण यईल' अशी भावूक कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने अशोक मामा असतील तर सिनेमा सुपरहिट होईल असे म्हटले आहे. चौथ्या एका यूजरने आजही पहिला भाग उत्साहात पाहतो, खूप खूप शुभेच्छा असे म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.

'नवरा माझा नवसाचा' सिनेमा विषयी

'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची निर्मिती किट्टू फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत करण्यात आली आहे. या चित्रपटात सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, सुनील तावडे, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर आणि विजय पाटकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आता 'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटात कोणते कलाकार दिसणार? चित्रपटाचे कथानक काय असणार? हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'नवरा माझा नवसाचा'मधील गाणी सुपरहिट

'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटातील गाणी सुपरहिट ठरली होती. त्यामध्ये चला ना गडे, हिरवा निसर्ग हा भवतीने, चला जेजुरीला जाऊ, वेदशास्त्रामाजी हो मंगलमूर्ती या गाण्यांचा सहभाग आहे. या गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

WhatsApp channel