सुवर्ण कारकिर्दीला सलाम; अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी ठरले नाट्यपरिषदेच्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सुवर्ण कारकिर्दीला सलाम; अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी ठरले नाट्यपरिषदेच्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी!

सुवर्ण कारकिर्दीला सलाम; अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी ठरले नाट्यपरिषदेच्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी!

May 24, 2024 02:17 PM IST

नाट्य क्षेत्रातील भरीव योगदानबद्दल अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना यंदाचा अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी ठरले नाट्यपरिषदेच्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी!
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी ठरले नाट्यपरिषदेच्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी!

नाटक, चित्रपट असो वा मालिका प्रत्येक माध्यमातून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना यावर्षीचा नाट्य परिषदेचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रोहिणी हट्टंगडी आणि अशोक सराफ यांच्यावर वेगवेगळ्या स्तरांतून अभिनंदनाच वर्षाव होत आहे. अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांनी नेहमीच प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. मराठी सिनेसृष्टी सोबतच त्यांनी हिंदीतही आपलं नाव गाजवलं. केवळ विनोदीच नव्हे तर, त्यांच्या गंभीर आणि नकारात्मक भूमिकांना देखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

अशोक सराफ यांनी आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधून नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकलं. अशोक सराफ यांचं मराठी मनोरंजन विश्वातील हे कलात्मक योगदान अगदीच अभिमानस्पद आहे. तर, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनीही मनोरंजन विश्वाची कित्येक वर्ष गाजवली. इतकंच नाही, तर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील स्वतःचा ठसा उमटवलाय. त्यांच्या ‘गांधी’ या चित्रपटाला बाफ्टा पुरस्कार देखील मिळाला होता. गेली चार ते पाच दशकं प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणाऱ्या रोहिणी हट्टंगडी आजही तितक्यातच उत्साहाने पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसतात.

अमिताभ बच्चन यांच्यासारखा चेहरा; मालिका विश्वातही गाजले! अभिनेते फिरोज खान यांच्या निधनामुळे शोककळा

दिग्गज कलाकारांचा होणार सन्मान!

नाटक, चित्रपट, मालिका अशा तीनही माध्यमातून रोहिणी हट्टंगडी नेहमी प्रेक्षकांच्या भेटीला येतात. नाट्य क्षेत्रातील याच भरीव योगदानबद्दल अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना यंदाच्या अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठी मनोरंजन विश्वातील हे दोन्ही कलाकार गेली अनेक वर्ष नाट्यसृष्टीची सेवा करत आहेत. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या कारकीर्दीचा सन्मान करण्यात येणार आहे.

कधी पार पडणार पुरस्कार सोहळा?

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने दरवर्षी १४ जून रोजी या पुरस्कार समारंभाचे आयोजन केले जाते. या समारंभात त्यावर्षीच्या जीवनगौरव पुरस्कार विजेत्यांचा सन्मान केला जातो. यंदाच्या वर्षी जेष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात झाला आहे. काही कारणांमुळे गेल्या तीन वर्षांपासून या पुरस्कारांचे वितरण झाले नव्हते. मात्र, आता नाट्य परिषदेची निवडणूक पार पडताच, अगदी तातडीने यावर निर्णय घेण्यात आला. नवनिर्वाचित मंडळाने जीवन गौरव पुरस्कार देण्याचं योजून यंदाच्या जीवन गौरव पुरस्कारांची घोषणा देखील केली.

Whats_app_banner