अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर दिसणार एकत्र! जाणून घ्या त्यांच्या चित्रपटाविषयी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर दिसणार एकत्र! जाणून घ्या त्यांच्या चित्रपटाविषयी

अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर दिसणार एकत्र! जाणून घ्या त्यांच्या चित्रपटाविषयी

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 26, 2024 11:57 AM IST

अभिनेते अशोक सराफ यांचा प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांसाठी पर्वणी असतो. आता त्यांच्या सोबत माधव अभ्यंकर दिसणार असल्यामुळे चित्रपट आणखी रंगतदार असणार याची खात्री आहे.

ashok saraf and madhav abhyankar: अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांचा चित्रपट
ashok saraf and madhav abhyankar: अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांचा चित्रपट

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणून अशोक सराफ हे ओळखले जातात. आपल्या अभिनयातून प्रेक्षकाना खळखळून हसायला भाग पाडणाऱ्या अशोक सराफ यांचा एक नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशोक मामांचा प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांसाठी पर्वणी असते. आता त्यांच्यासोबत माधव अभ्यंकर दिसणार असल्यामुळे चित्रपट उत्सुकता वाढवणारा ठरत आहे. या चित्रपटाचे नाव 'लाईफ लाईन' असे आहे.

काय आहे चित्रपटाची कथा

विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या रितीरिवाजांमधील संघर्ष यावर आधारित या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाचा: शर्वरी वाघचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुंज्या' होणार ओटीटीवर प्रदर्शित? वाचा कधी आणि कुठे

काय आहे चित्रपटाचे पोस्टर?

शेअर करण्यात आलेल्या पोस्टरवर महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त महानायक अशोक सराफ आणि आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने घराघरांत पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते माधव अभ्यंकर दिसत आहेत. अशोक सराफ यांच्या गळ्यातील स्टेथोस्कोप आणि माधव अभ्यंकर यांच्या गळ्यातील तुळशीमाळ यावरून या दोघांमधील मतभेदाचा अंदाज प्रेक्षकांना येऊ शकतो. मात्र हा मतभेद कोणत्या कारणावरून आहे, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे.
वाचा: 'या' कारणामुळे वर्षातून ६ महिने आईसोबत एका घरात राहते सई ताम्हणकर

चित्रपटात कोणते कलाकार दिसणार?

या चित्रपटात अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यासोबत हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते आहेत लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंट. राजेश शिरवईकर यांची कथा, पटकथा, संवाद आणि गीत लाभलेल्या या चित्रपटातील गाणी अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केली असून या भावपूर्ण गाण्यांना अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर ह्यांचा आवाज लाभला आहे. 'लाईफ लाईन' हा चित्रपट ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी आहे.
वाचा: अद्वैतने सर्वांसमोर कलाच्या गळ्यात घातले मंगळसूत्र, आजच्या भागात काय घडणार?

Whats_app_banner