Ashish Vidyarthi: अभिनेते आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या पत्नीची खोचक पोस्ट!
Ashish Vidyarthi Second Marriage: अभिनेता आशिष विद्यार्थी यांच्या लग्नाच्या बातमीनंतर त्यांच्या पहिल्या पत्नीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
Ashish Vidyarthi Second Marriage: बॉलिवूड आणि टीव्हीचे दिग्गज अभिनेते आशिष विद्यार्थी त्यांच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आले आहेत. अभिनेत्याच्या लग्नाच्या बातमीनंतर त्यांच्या पहिल्या पत्नीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या ६०व्या वर्षी कोलकाता येथील फॅशन डिझायनरशी लग्न केले आहे. नुकतीच त्यांच्या लग्नाची माहिती समोर आली आहे. त्यानंतर या अभिनेत्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, आता त्यांच्या पहिल्या पत्नीची पोस्ट देखील चर्चेत आली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
आता आशिष विद्यार्थीची पहिली पत्नी राजोशी बरुआ उर्फ पिलू विद्यार्थी यांनी तिच्या इंस्टाग्रामवर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. यात त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. परंतु, त्या त्यांच्या पोस्टमध्ये अतिविचार आणि जीवनातील गुंतागुंत याबद्दल बोलल्या आहेत. राजोशी बरुआ यांनी दोन पोस्टद्वारे आपले मनोगत व्यक्त केले आहे. पहिल्या पोस्टमध्ये, त्यांनी स्वतःला दुखावलेल्या व्यक्तीबद्दल काही शब्द लिहिले आहेत.
Vaibhavi Upadhyaya: नेमका कसा झाला वैभवी उपाध्यायचा अपघात? पोलीस म्हणतात ‘सीटबेल्ट न लावता...’
राजोशी यांनी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिलेय की, ‘योग्य व्यक्ती तुम्ही त्याच्यासाठी काय आहात हा प्रश्न कधीच विचारणार नाही. ती व्यक्ती असे काहीच करणार नाही की, ज्याने तुमचे मन दुखावले जाईल. हे नेहमी लक्षात ठेवा.’ दुसर्या एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, ‘मनातील अतिविचार आणि शंका या वेळी सोडून द्या. तुम्हाला सर्व काही स्पष्टपणे दिसू दे. तुमचे जीवन शांती आणि आनंदाने भरून जावो. आता आशीर्वाद मिळवण्याची वेळ आली आहे. तो तुमचा हक्क आहे.’ त्यांच्या या दोन्ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत.
अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी २५ मे रोजी त्याचे जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत कोर्ट मॅरेज केले आहे. अभिनेत्याने आसामची रहिवासी असलेल्या रुपाली बरुआ हिची जीवनसाथी म्हणून निवड केली. दोघांनीही कोलकात्यात आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याची शपथ घेतली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रुपाली बरुआ फॅशन इंडस्ट्रीशी संबंधित आहे आणि तिचे कोलकातामध्ये फॅशन स्टोअर देखील आहे.
विभाग