मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Amit shah : गृहमंत्री अमित शहांच्या फर्माईशवर आशा भोसलेंनी गायलं 'अभी ना जाओ छोडकर..' गाणं

Amit shah : गृहमंत्री अमित शहांच्या फर्माईशवर आशा भोसलेंनी गायलं 'अभी ना जाओ छोडकर..' गाणं

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 06, 2024 01:42 PM IST

Asha Bhosle: आशा भोसले 'अभी ना जाओ छोडकर..' गाणे गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

Asha Bhosle and amit shah
Asha Bhosle and amit shah

Asha Bhosle Video: प्रसिद्ध गायिका आणि महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या ‘बेस्ट ऑफ आशा’ या छायाचित्रणाचे प्रकाशन बुधवारी करण्यात आले. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या छायाचित्रणाचे अनावरण करण्यात आले. दरम्यान, आमित शाह यांच्या फर्माइशवर आशा भोसले यांनी गाणे गायले आहे. त्यांचा गाणे गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बुधवारी सकाळी सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आशा भोसले यांच्या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांच्यासह त्यांच्या पत्नी ॲड. प्रतिमा शेलार, जानाई भोसले, आनंद भोसले, व्हॅल्युएबल ग्रुपचे अमेय हेटे आणि अंकित हेटे, जीवन गाणीचे प्रसाद महाडकर आणि डिझायनर नूतन आजगावकर हजर होते.
वाचा: अंबानींच्या कार्यक्रमाला कंगना गैरहजर, काय आहे कारण?

‘बेस्ट ऑफ आशा’ या पुस्तकात प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी टिपलेल्या आशा भोसले यांच्या छायाचित्रांचे संकलन आहे. हे पुस्तक व्हॅल्युएबल ग्रुपने प्रकाशित केले आहे. आशा भोसलेंची गायनशैली, त्यांची गाणी, त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास या पुस्तकात प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांमध्ये टिपण्यात आला आहे. तिच्याशी निगडीत आठवणींसह त्यांच्या ४२ सर्वोत्कृष्ट गाण्यांचा हा सुंदर रचलेला ‘खजिना’ पेक्षा कमी नाही.

IPL_Entry_Point

विभाग