गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले अनेकदा त्यांच्यासोबत पाहायला मिळते. ही आजी आणि नातीची जोडी अनेकदा एकत्र पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर जनाईच्या काही फोटोंची चर्चा रंगली आहे. खरंतर जनाईने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. दरम्यान, एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या फोटोमध्ये जनाई ही क्रिकेटपटू मोहम्मद सिराज दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
जनाईने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर वाढदिवस साजरा करतानाचे फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत ती केक कापत असून आशा भोसले-जॅकी श्रॉफ तिच्या शेजारी उभे आहेत. दुसऱ्या फोटोत तिच्यासोबत क्रिकेटपटू मोहम्मद सिराज दिसत आहे. दोघेही हसत हसत एकमेकांकडे पाहत आहेत. या दोघांमध्ये काही तरी सुरू असल्याचा अंदाज चाहते हे फोटो पाहून लावत आहेत. सोशल मीडियावर या फोटोची जोरदार चर्चा रंगली आहे.
जनाई आणि मोहम्मद सिराजच्या फोटोवर चाहते भरपूर कमेंट करत आहेत. एका यूजरने कमेंट करत, "काय फोटो आहे. मिया भाई.. खूप छान फोटो आहे" असे म्हटले आहे. दुसऱ्या एका यूजरने, 'डाळीत काहीतरी काळे आहे' असे म्हटले आहे. दुसऱ्या एका यूजरने, "तू सिराज भाईजानशी लग्न करणार आहेस का?" अशी कमेंट केली आहे.
वाचा: महाकुंभ मेळ्यामधील व्हायरल झालेल्या मोनालिसाचे नशीब फळफळलं, सिनेमामध्ये करणार काम?
मोहम्मद सिराजव्यतिरिक्त श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सुयश प्रभुदेसाई असे अनेक क्रिकेटपटू या पार्टीत उपस्थित होते. एका फोटोत जनाईसोबत बिग बॉसची स्पर्धक आयेशा खानही दिसत आहे. जनाई द प्राइड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज या चित्रपटात झळकणार आहे. यात ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी राणी साई भोसले यांची भूमिका साकारणार आहे. तसे तर जनाई देखील गायिका असून तिचे 'कहांदी है' हे गाणे काही दिवसांतच रिलीज होणार आहे.
संबंधित बातम्या