आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका म्हणजे आशा भोसले. आज ८ सप्टेंबर रोजी आशा भोसले यांचा वाढदिवस आहे. त्यांना संगीताचा वारसा त्यांचे वडील दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून मिळाला होता. आशा यांनी आजवर अनेक गाणी गायिली आहेत. १९४३ साली त्यांनी करिअरला सुरुवात केली होती. आशा या त्यांच्या कामासोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत होत्या. एक वेळ तर अशी होती की आशा यांनी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन लग्न केले होते. तसेच गरोदरपणात सासरच्यांनी घराबाहेरही काढले होते.
आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगली, महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे सुद्धा प्रसिद्ध शास्त्रीय गायक होते. त्या दिग्गज गायिका लता मंगेशकर यांच्या धाकटी बहीण आहेत. आशा भोसले यांच्या खूप गोड आणि सूरेल आवाजाने भल्याभल्यांना मंत्रमुग्ध केले आहे. पण त्यांचे वैयक्तिक जीवनही तितकेच कटुतेने भरलेले होते. वयाच्या १७व्या वर्षी आशा यांचे गणपत राव भोसले यांच्याशी लग्न झाले. गणपत राव हे आशा यांच्यापेक्षा १६ वर्षांनी मोठे होते. या लग्नामुळे लता दीदी मात्र नाराज होत्या. कारण गणपतराव हे लता दीदींचे सेक्रेटरी होते. जवळपास ११ वर्षांनंतर गणपत राव आणि आशा यांनी वेगळे होणाचा निर्णय घेतला. त्यांनी तीन मुले होती.
पण आशा यांच्या या लग्नाला कुटुंबीयांची संमती नव्हती. लता मंगेशकर यांचा तर या नात्याला पूर्णपणे विरोध होता. मात्र, आकंठ प्रेमात बुडालेल्या आशा यांना काहीच कळत नव्हते. त्यांनी कुटुबीयांच्या विरोधात जाऊन पळून जाऊन लग्न केले. एका मुलाखतीमध्ये आशा यांनी सांगितले की, गणपतरावांच्या घरच्यांनी त्यांना कधीच सून म्हणून स्वीकारले नाही. गणपतरावांनीसुद्धा त्यांचा खूप छळ केला. आता ताई गरोदर होत्या तेव्हा गणपत यांनी त्यांना मारहाण केली व घराबाहेर काढले. त्यामुळे त्या हेमंत आणि वर्षा या आपल्या मुलांसोबत माहेरी परतल्या.'
वाचा: बाप्पा आणायला गेलेल्या अंकिता लोखंडेला मागावी लागली महिलेची माफी, नेमकं काय घडलं होतं?
दरम्यान, आशा यांचे करिअर यशाच्या शिखरावर होते. त्यांची अनेक गाणी हिट ठरत होती. एकदा रेकॉर्डिंगच्या निमित्ताने आशा यांची ओळख आरडी बर्मन यांच्याशी झाली. पहिल्या पत्नीलापासून विभक्त झाल्यानंतर बर्मन यांना आशा भोसले आवडू लागल्या होत्या. एकदा तर बर्मन यांनी आशा यांना लग्नासाठी विचारले होते. आशा भोसले या आरडी बर्मन यांच्याहून ६ वर्षांनी मोठ्या होत्या. एका मुलाखतीमध्ये आशा यांनी त्यांच्या नात्याविषयी विचारण्यात आले होते. तेव्हा त्या म्हणाल्या, 'हे माझ्या मागे लागले होते. आशा तुझ्या आवाज खूप मस्त आहे. शेवटी काय करणार? हो बोलले.' पुढे त्यांनी बहिण लता मंगेशकर यांची त्यांच्या नात्यावर कशी प्रतिक्रिया होती हे सांगितले. 'दीदीने यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. ती मला काही बोलली नाही किंवा पंचम यांच्याशी काही' असे आशा भोसले म्हणाल्या.