मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 19, 2024 07:55 AM IST

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी जेवढा त्याच्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे, तेवढाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेकदा वादात सापडला आहे.

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?
मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याला ओळखत नाही असा क्वचितच कुणी व्यक्ती असेल... नवाजुद्दीन सिद्दीकी याने आजवर अनेक कष्ट करून इथवरचा पल्ला गाठला आहे. मनोरंजन विश्वातील त्याचा हा प्रवास त्याने स्वबळावर केला आहे. अनेक नकारांना तोंड दिल्यानंतर आज त्याची गणना अशा स्टार्समध्ये होते ज्यांच्यासोबत प्रत्येकाला काम करण्याची इच्छा आहे. 'गँग्स ऑफ वासेपूर', 'मांझी- द माउंटन मॅन', 'बजरंगी भाईजान', 'बदलापूर', 'किक', 'रमन राघव २.२’, 'मंटो' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. आज (१९ मे) नवाजुद्दीन सिद्दीकी याचा वाढदिवस आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नवाज जेवढा त्याच्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे, तेवढाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेकदा वादात सापडला आहे. पत्नीची हेरगिरी आणि लहान भावाच्या पत्नीला मारहाण केल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला होता. कधी पार्किंगवरून शेजारच्या महिलेशी वाद झाला, तर कधी ऋषी कपूरवर वक्तव्य करून तो वादात सापडला. नवाजुद्दीन त्याच्या 'ॲन ऑर्डिनरी लाइफ' या पुस्तकामुळेही खूप वादात सापडला होता.

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

चित्रपटांमध्येही साकारल्या वेटर, चोर आणि खबरी भूमिका!

नवाजने एकेकाळी चौकीदार म्हणून काम केले होते आणि चित्रपटात आल्यानंतर त्याला वेटर, चोर आणि खबरी यांसारख्या छोट्या भूमिका करताना अजिबात संकोच वाटला नाही. जेव्हा त्याला चित्रपटात काम करण्यासाठी पैसे मिळाले नाही, तेव्हा त्याने प्रॉडक्शन हाऊसमध्ये जेवण जेऊन फी वसूल केली होती. १९७४मध्ये उत्तर प्रदेशातील बुढाना या छोट्याशा शहरात जन्मलेला नवाजुद्दीन सिद्दीकी आज त्याचा ५०वा वाढदिवस साजरा करत आहे.

मानधन नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये जाऊन जेवायचा!

करिअरच्या सुरुवातीला नवाजुद्दीनने 'सरफरोश', 'शूल', 'मुन्नाभाई एमबीबीएस' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत. एका मुलाखतीत तो म्हणाला होता की, ‘मी राम गोपाल वर्मा यांच्या 'जंगल' चित्रपटातही काम केले आहे. तुम्ही जरा नीट बघितले तर तुम्हाला मी दिसेन. मात्र, जेव्हा मला या चित्रपटात काम करण्यासाठी पैसे मिळाले नाहीत, तेव्हा मी अनेक वेळा प्रॉडक्शन हाऊसमध्ये जाऊन फी वसूल करण्यासाठी जेवण जेवत होतो. त्या काळात आम्ही पायी चालत संघर्ष करायचो. अशावेळी आम्ही सरळ प्रॉडक्शन ऑफिस गाठून जेवायला जायचो. कित्येकदा आम्हाला कॉलर पकडून बाहेरही काढले जायचे. मात्र, दिवसभर चालता येईल एवढं जेवण फुकट मिळेल असा विचार आम्ही त्यावेळी करत होतो.’

टी-२० वर्ल्डकप २०२४