Aryan Khan: ‘पापा’ शाहरुख खाननंतर बॉलिवूडच्या आणखी एका सुपरस्टारसाठी दिग्दर्शन करणार आर्यन खान!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aryan Khan: ‘पापा’ शाहरुख खाननंतर बॉलिवूडच्या आणखी एका सुपरस्टारसाठी दिग्दर्शन करणार आर्यन खान!

Aryan Khan: ‘पापा’ शाहरुख खाननंतर बॉलिवूडच्या आणखी एका सुपरस्टारसाठी दिग्दर्शन करणार आर्यन खान!

Published Jun 05, 2023 04:59 PM IST

Aryan Khan Web Series Stardom : मीडिया रिपोर्टनुसार शाहरुख खाननंतर आता आर्यन खान आणखी एका मोठ्या सुपरस्टार अभिनेत्यासाठी दिग्दर्शन करणार आहे.

Aryan Khan
Aryan Khan

Aryan Khan Web Series Stardom : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान लवकरच इंडस्ट्रीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. जाहिरातींच्या दुनियेत त्याने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आहे, पण आता तो ग्लॅमरच्या दुनियेतही जादू करण्याची तयारी करत आहे. मात्र, वडिलांप्रमाणे तो कॅमेऱ्यासमोर अभिनय करणार नाही, तर कॅमेऱ्याच्या मागे राहून आपली क्षमता दाखवणार आहे. काही काळापूर्वीच त्याच्या डेब्यू वेब सीरिज 'स्टारडम'चे शूटिंग मुंबईत सुरू झाले आहे.

आर्यन खानच्या या वेब सीरिजमध्ये लक्ष्य लालवानी मुख्य दिसणार भूमिकेत आहे. ते, मीडिया रिपोर्टनुसार शाहरुख खाननंतर आता आर्यन खान आणखी एका मोठ्या सुपरस्टार अभिनेत्यासाठी दिग्दर्शन करणार आहे. आर्यन खानच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी त्याचे वडील अर्थात शाहरुख खान त्याला प्रत्येक पावलावर साथ देत आहे. पण आता त्याला आणखी एका बॉलिवूड सुपरस्टारची साथ मिळाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आर्यन खानच्या 'स्टारडम' या वेब सीरिजमध्ये काम करणार आहे.

Video: ‘जरा हटके जरा बचके’ पाहायला आलेल्या प्रेक्षकांना विकी-साराचं खास सरप्राईज!

मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, रणबीरचा वेब सीरिजमध्ये एक छोटासा कॅमिओ असणार आहे. या भागाचे त्याने शूटिंग मुंबईत पूर्ण झालेआहे. आर्यन खानच्या डेब्यू वेब सीरिजमध्ये केवळ रणबीर कपूरच नाही, तर करण जोहरही कॅमिओ करताना दिसणार आहे. आर्यनच्या डेब्यू सीरिजचे शूटिंग सुरू करण्यापूर्वी शाहरुख खानही त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या सेटवर पोहोचला होता.

आर्यन खानची ही पहिली वेब सीरिज 'स्टारडम' एकूण ६ भागांची असणार आहे. या मालिकेत लक्ष्य ललवानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणाऱ्या आर्यन खानची ही वेब सीरिज हिंदी चित्रपटसृष्टीची कहाणी सांगणार असल्याचं बोललं जात आहे, ज्यामध्ये केवळ रणबीर कपूरच नाही, तर इतर अनेक स्टार्सही यात कॅमिओ करताना दिसणार आहेत.

Whats_app_banner