बॉलिवूड इंडस्ट्री ही झगमगाटासाठी विशेष ओळखली जाते. सतत होणाऱ्या आलिशान पार्ट्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. पण आजकाल बॉलिवूडमधील अशी एकही पार्टी नसेल ज्या पार्टीला ऑरी उर्फ ओरहान अवतरमानीने हजेरी लावली नाही. तो जवळपास सर्वच बॉलिवूड कलाकारांच्या पार्टीला हजेरी लावताना दिसतो. नुकताच झालेल्या एका पार्टीमध्ये देखील त्याने हजेरी लावली. पण तुम्हाला माहिती आहे का बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा लेक आर्यन ऑरीसोबत फोटो काढताना कधीच हासत नाही. काय आहे कारण चला जाणून घेऊया...
नुकताच तानिया श्रॉफचा वाढदिवस झाला. तिने वाढदिवस साजरा करण्यासाठी एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला आर्यन खान, अर्जुन कपूर, अनन्या पांडे, उर्फी जावेद, वेदांग रैना, निर्वाण खान आणि अरहान खान असे अनेक स्टारकिड्स दिसले. ऑरी देखील या पार्टीमध्ये होता. ऑरी आर्यन खानसोबत फोटो काढण्यासाठी आला तेव्हा आर्यनने थेट कॅमेराकडे पाहिले आणि फोटो काढला. त्याच्या चेहऱ्यावर हसू देखील नव्हते.
वाचा: संघर्ष बिगर काही खरं नसतं!; "आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा" सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
पार्टीसाठी आर्यनने काळ्या रंगाचा टीशर्ट आणि पँट परिधान केली होती. कदाचित आर्यनला ऑरी आवडत नसल्यामुळे त्याने चेहऱ्यावर आनंद व्यक्त केला नाही असे म्हटले जात आहे. तर काहींनी आर्यन नेहमीच न हसता पोझ देत असतो असे म्हटले आहे. दुसऱ्या एका फोटोत अर्जुन कपूरने ऑरीला मिठी मारली असून त्याने अभिनेत्याच्या छातीवर डोकं ठेवलं आहे. अर्जुन प्रिंटेड ब्लॅक अँड व्हाईट शर्ट आणि ट्राऊझरमध्ये दिसला.
वाचा: गरोदरपणात अभिनेत्रीला लागले होते बिअर पिण्याचे डोहाळे! जाणून घ्या ही अभिनेत्री आहे तरी कोण?
अनन्या पांडेसोबत कॅमेऱ्यासाठी पोज देताना देखील ऑरी दिसला होता. त्याने निळ्या रंगाचा टीशर्ट आणि डेनिम जीन्स घातली आहे. एका फोटोमध्ये ऑरीने हसत हसत उर्फीच्या गालावर किस केले. या पार्टीसाठी अरहानने स्ट्रिप्ड व्हाईट शर्ट आणि डेनिम परिधान केली होती. तर त्याचा चुलत भाऊ निर्वाणने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि डेनिम परिधान केली होती.
वाचा: राजेश खन्नासोबत सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून डिंपल कपाडीया 'या' अभिनेत्याला करत होत्या डेट
आर्यन खानच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. तो एक अभिनेता म्हणून नाही तर दिग्दर्शक म्हणून इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकताना दिसत आहे. रेड चिलीज एंटरटेन्मेंट निर्मित एका वेब सीरिजचे तो दिग्दर्शन करणार आहे. या सीरिजमध्ये बॉबी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण या सीरिजविषयी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
संबंधित बातम्या