शाहरुखचा लेक ‘या’ परदेशी अभिनेत्रीला करतोय डेट? चर्चांना उधाणUntitled Story-aryan khan and brazilian model larissa bonesi dating rumors around ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  शाहरुखचा लेक ‘या’ परदेशी अभिनेत्रीला करतोय डेट? चर्चांना उधाणUntitled Story

शाहरुखचा लेक ‘या’ परदेशी अभिनेत्रीला करतोय डेट? चर्चांना उधाणUntitled Story

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 02, 2024 05:11 PM IST

गेल्या काही दिवसांपासून स्टारकिड्स हे सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. या स्टारकिड्सच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

शाहरुखचा लेक ‘या’ परदेशी अभिनेत्रीला करतोय डेट? चर्चांना उधाण
शाहरुखचा लेक ‘या’ परदेशी अभिनेत्रीला करतोय डेट? चर्चांना उधाण

बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच त्यांची मुले सध्या सर्वांचे लक्ष वेधताना दिसतात. बॉलिवूडचा किंग शाहरुखचा मुलगा आर्यन खान देखील सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. आर्यन काय करतो, त्याच्या आयुष्यात कोणती मुलगी आहे का? हे सगळं जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सध्या आर्यन एका परदेशी अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता ही अभिनेत्री नेमकी कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

रेडिटवर एका यूजरने जुन्या म्यूझिक प्रोग्राममधील एक क्लिप शेअर केली आहे. या क्लिपमध्ये आर्यन खान परदेशी मॉडेल लारिसा बोन्सीसोबत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवरुन अनेकांनी ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आर्यन खानच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच दोघांच्या कुटुंबातील सदस्य एकमेकांना सोशल मीडियावर फॉलो करत असल्याचे देखील म्हटले जात आहे.
वाचा: एक दिवस अचानक मालिकेतून काढलं; ‘आई कुठे काय करते’मधील अभिनेत्रीचा खुलासा

आर्यन किंवा लारिसाने दोघांच्या नात्यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे खरच डेट करत आहेत की केवळ चर्चा सुरु आहेत याविषयी माहिती समोर आलेली नाही. आर्यन खानला त्याचे आयुष्य हे खासगी ठेवायला आवडते. तो कधीच माध्यमांशी संवाद साधताना दिसत नाही. तो कायमच प्रसिद्धी, फेम यापासून लांब असल्याचे पाहायला मिळते.
वाचा: संघर्षयोद्धा ते जुनं फर्निचर, एप्रिल महिन्यात मराठी चित्रपटांची मेजवानी

काही दिवसांपूर्वी लारिसाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने एक पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला आर्यन खान देखील हजर असल्याचे म्हटले जात आहे. एका यूजरने या पार्टीमधील दोघांचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यामुळे लारिसा आणि आर्यनच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे. आता ही परदेशी अभिनेत्री खरच शाहरुख खानची सून होणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

आर्यनच्या कामाविषयी

आर्यन खान सध्या एका वेब सीरिजचे दिग्दर्शन करत असल्याचे म्हटले जात आहे. या सीरिजच्या माध्यमातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सीरिजविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. तसेच या सीरिजमध्ये शाहरुख महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. सध्या तो एका ब्रँडचा अॅम्बेसिडर आहे. या ब्रँडच्या कपड्याच्या जाहिरातीमध्ये तो दिसत आहे. आता आर्यनच्या खासगी आयुष्याविषयी माहिती समोर आली आहे.