Aryan Khan : आर्यनने दिल्लीत खरेदी केला नवा फ्लॅट, शाहरुख खानशी आहे खास कनेक्शन
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aryan Khan : आर्यनने दिल्लीत खरेदी केला नवा फ्लॅट, शाहरुख खानशी आहे खास कनेक्शन

Aryan Khan : आर्यनने दिल्लीत खरेदी केला नवा फ्लॅट, शाहरुख खानशी आहे खास कनेक्शन

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Jul 29, 2024 04:17 PM IST

Aryan Khan : आर्यन खानने खरेदी केलेला दोन मजली फ्लॅट हा शाहरुख खान आणि गौरी खानसाठी खास आहे. या फ्लॅटची किंमत ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल...

On the work front, Aryan Khan is busy with his first OTT show.
On the work front, Aryan Khan is busy with his first OTT show.

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन हा कायम चर्चेत असतो. लवकरच आर्यन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्यामुळे चाहते आतुर झाले आहेत. त्यापूर्वी आर्यन खानने दिल्लीमध्ये दोन मजली फ्लॅट खरेदी केला आहे. या फ्लॅटशी आर्यनचे आई-वडील म्हणजेच गौरी खान आणि शाहरुखचे खास नाते असल्याचे समोर आले आहे. तसेच या फ्लॅटसाठी आर्यनने मोठी रक्कम देखील मोजली आहे.

काय आहे फ्लॅटची खासियत?

आर्यन खानने खरेदी केलेला हा फ्लॅट दक्षिण दिल्लीमध्ये आहे. याच इमारतीमध्ये एकेकाळी गौरी खान आणि शाहरुख खान राहात होते. आता आर्यनने ते दोघे राहात असलेले घर विकत घेतले आहे. या घरासाठी आर्यनने ३७ कोटी रुपये मोजले आहेत. हे दोन मजली घर नेमके कसे आहे? हे पाहण्यासाठी सर्वजण आता उत्सुक आहेत.

इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आर्यनने दिल्लीच्या पंचशील पार्कमध्ये ही प्रॉपर्टी खरेदी केली आहे. या इमारतीचा तळमजला आणि बेसमेंटचमध्ये शाहरुख आणि गौरी राहात होते. त्यांनी करिअरच्या अगदी सुरुवातीला तेथे राहण्याचा निर्णय घेतला होता. या घरासाठी आर्यनने २.६४ कोटी रुपये स्टँप ड्यूटी भरली आहे. तसेच गौरी आर्यनच्या या घराचे इंटिरिअर डिझाइन करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

'दिल्लीत बॉलिवूड स्टार्सकडून मोठ्या रक्कमेचे व्यवहार क्वचितच होतात. यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी दक्षिण दिल्लीतील गुलमोहर पार्कमधील आपली मालमत्ता सुमारे २३ कोटी रुपयांना विकली होती,' अशी माहिती बुटिक रिअल इस्टेट कन्सल्टन्सी फर्म वेल्थव्हिसोरी कॅपिटलचे संस्थापक प्रदीप प्रजापती यांनी दिली.

आर्यन आधी सुहानाने खरेदी केली मालमत्ता

शाहरुखची मुले सुहाना खान आणि आर्यन यांनी अलिकडच्या महिन्यांत अनेक रिअल इस्टेट गुंतवणूक केली आहे. गेल्या वर्षी जानेवारीमहिन्यात सुहानाने अलिबागमध्ये १२.९१ कोटी रुपयांना शेतजमीन विकत घेतली. वर्षभरानंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये तिने मुंबईतील समुद्रकिनारी असलेला सीफेसिंग फ्लॅट खरेदी केला. जवळपास तिने १० कोटी रुपयांना ही मालमत्ता विकत घेतली होती.
वाचा: इंडियन आयडल जिंकल्यानंतर मिळालेल्या पैशांचे अभिजीत सावंतने काय केले? वाचा सविस्तर

सुहानाच्या कामाविषयी

सुहानाने झोया अख्तरच्या 'द आर्चीज' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. सध्या ती तिच्या पुढच्या सुजॉय घोषच्या 'द किंग' या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. या चित्रपटात ती वडिलांसोबत म्हणजेच शाहरुखसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच आर्यन 'स्टारडम' या वेब शोद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे.

Whats_app_banner