मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  व्हायचं होतं डॉक्टर अन् बनला अॅक्टर; मग असं काय घडलं की मनोरंजन विश्वापासूनही दुरावला अरविंद स्वामी?

व्हायचं होतं डॉक्टर अन् बनला अॅक्टर; मग असं काय घडलं की मनोरंजन विश्वापासूनही दुरावला अरविंद स्वामी?

Jun 30, 2024 07:53 AM IST

केवळ साऊथच नव्हे तर, अभिनेता अरविंद स्वामीने हिंदी चित्रपटांमध्येही आपले दमदार अभिनय कौशल्य दाखवले.

व्हायचं होतं डॉक्टर अन् बनला अॅक्टर!
व्हायचं होतं डॉक्टर अन् बनला अॅक्टर!

अरविंद स्वामी हा प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आहे. त्याने मनोरंजन विश्वाला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आपल्या दमदार अभिनयाने अभिनेता प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायचा. केवळ साऊथच नव्हे तर, या अभिनेत्याने हिंदी चित्रपटांमध्येही आपले दमदार अभिनय कौशल्य दाखवले. मात्र, त्याने आपला कौटुंबिक व्यवसाय सांभाळसाठी चित्रपटसृष्टीतील आपली दमदार कारकीर्द सोडून दिली होती. परंतु, जेव्हा त्याला अभिनयात पुनरागमन करावे वाटले, तेव्हा त्याचा अपघात झाला. त्यानंतर तो मनोरंजन विश्वापासून कायमचा दुरावला. आज त्याचा वाढदिवस आहे.

अभिनेता अरविंद स्वामीचा जन्म तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे झाला. अभिनेत्याचे प्रारंभिक शिक्षण तेथेच झाले. अरविंदने अमेरिकेत इंटरनॅशनल मार्केटिंगमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. अरविंदने केवळ दक्षिणेतील चित्रपटांतूनच अभिनय केला असे नाही, तर त्याने 'रोजा' आणि 'बॉम्बे' यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले.

Shatrughan Sinha: लेकीच्या लग्नानंतर ५ दिवसांतच आजारी पडले शत्रुघ्न सिन्हा; वडिलांना भेटायला सोनाक्षी-झहीर रुग्णालयात!

अभिनयाचे बारकावे शिकून घेतले!

अभिनेता अरविंद स्वामीला डॉक्टर व्हायचे होते. मात्र, पॉकेटमनीसाठी त्याने मॉडेलिंगचे काम सुरू केले होते. नंतर मणिरत्नम यांनी त्याला एका जाहिरातीत पाहिले आणि भेटायला बोलावले. त्यानंतर त्यांनी आणि संतोष सिवन यांनी त्यांना चित्रपट निर्मितीची माहिती दिली. १९९१मध्ये, अरविंदने मणिरत्नम यांच्या 'थलापथी' चित्रपटाद्वारे अभिनयाच्या जगात प्रवेश केला. त्याच्या पुढच्या वर्षी १९९२मध्ये तो 'रोजा' चित्रपटात दिसला. मणिरत्नम आणि संतोष विआन यांनी त्याला अभिनयाच्या सर्व बारकावे शिकवले.

ट्रेंडिंग न्यूज

Bigg Boss OTT 3: नीरज गोयतनंतर आणखी एक स्पर्धक होणार बेघर! ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या स्पर्धकांना बसणार धक्का

करिअरमधून घेतला ब्रेक

१९९५मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बॉम्बे' या चित्रपटाला राज्य आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार मिळाले. या चित्रपटातील अभिनेत्याच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. यानंतर त्याला अनेक चित्रपटांसाठी पुरस्कार मिळाले. अरविंद सतत यशाच्या शिखरांना स्पर्श करत होता. परंतु, त्याने आपल्या कौटुंबिक व्यवसायाची काळजी घेण्यासाठी अभिनय करिअरमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. परंतु, जेव्हा त्याने चित्रपटांमध्ये पुनरागमन करण्याचा विचार केला, तेव्हा त्याचा एक भयानक अपघात झाला, ज्यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. या अपघातातून सावरायला त्याला बराच वेळ लागला.

अरविंदच्या बॉलिवूड करिअरबद्दल बोलायचे झाले, तर त्याने १९९८मध्ये 'सात रंग के सपने' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत जुही चावला होती. मात्र, पडद्यावर हा चित्रपट काही विशेष जादू करू शकला नाही. मात्र, अभिनेता अरविंद स्वामीने वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपट करून बरीच चर्चा निमार्ण केली होती.

WhatsApp channel
विभाग