अरुंधती परत येतेय! लोकप्रिय मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये दिसली मधुराणी प्रभुलकरची झलक
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अरुंधती परत येतेय! लोकप्रिय मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये दिसली मधुराणी प्रभुलकरची झलक

अरुंधती परत येतेय! लोकप्रिय मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये दिसली मधुराणी प्रभुलकरची झलक

Jan 28, 2025 10:20 AM IST

Arundhati Is Coming Back : 'आई कुठे काय करते' ही मालिका ऑफ एअर गेल्यानंतर अरुंधती काय करतेय, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता.

अरुंधती परत येतेय! लोकप्रिय मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये दिसली मधुराणी प्रभुलकरची झलक
अरुंधती परत येतेय! लोकप्रिय मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये दिसली मधुराणी प्रभुलकरची झलक

Madhurani Prabhulkar In Serial : 'आई कुठे काय करते' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली 'अरुंधती' म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. छोट्या पडद्यावर या मालिकेने मोठा प्रेक्षक वर्ग निर्माण केला होता. कुटुंबात रमलेली आई ते एक यशस्वी उद्योजिका, असा अरुंधतीचा प्रवास सगळ्यांनाच खूप आवडला होता. 'आई कुठे काय करते' ही मालिका ऑफ एअर गेल्यानंतर अरुंधती काय करतेय, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. या मालिकेत 'अरुंधती'ची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने साकारली होती. मधुराणी प्रभुलकर हिने पुन्हा एकदा या पडद्यावर दिसावे, अशी तिच्या चाहत्यांची इच्छा होती आणि त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.

मधुराणी प्रभुलकर म्हणजेच अरुंधती पुन्हा एकदा मराठी मालिकेत झळकणार आहे. 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' ही नव्यानेच सुरू झालेली आणि अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली मालिका असून, यातच आता 'अरुंधती' देखील दिसणार आहे. 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेत सध्या स्वीटी आणि मकरंद यांच्या लग्नाची लगबग सुरू आहे. या दोघांच्या लग्नाचे वेगवेगळे समारंभ या घरात पार पडताना दिसत आहे. याच लग्न सोहळ्यात सामील होण्यासाठी अरुंधती पाहुणी म्हणून येणार आहे. 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेच्या सेटवरील मधुराणीचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Madhurani Prabhulkar: सुंदरशा चेहऱ्यावर आनंद वाहतोय काठोकाठ... 'अरुंधती'चा मनमोहक मधाळ लूक!

मालिकेचा प्रोमो पाहून चाहते झाले खूश!

यानंतर मालिकेचा एक छोटासा प्रोमो देखील पाहायला मिळाला, ज्यामध्ये मधुराणीची झलक दिसली. या मालिकेत मधुराणी आईसोबत अर्थात निवेदिता सराफ यांच्यासोबत गप्पा मारताना दिसली आहे. 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेच्या टीमने एक छानशी कल्पना लढवून अरुंधतीला पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. पुन्हा एकदा मधुराणीला 'अरुंधती'च्या रूपात बघून प्रेक्षकदेखील सुखावून गेले आहेत.

मीही अरुंधतीला मिस केलं!

या खास एन्ट्री बद्दल बोलताना मधुराणी प्रभुलकर म्हणाली की, 'पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर अरुंधती साकारायला मिळतेय याचा खूप आनंद होतोय. साधारण दीड महिन्यापूर्वी आमच्या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता, जसे माझी चाहते आणि प्रेक्षक अरुंधतीची खूप आठवण काढत आहेत, तसंच मला देखील तिची खूप आठवण येत होती. मालिकेच्या सेटवर सुरू असणारी धावपळ, सेटवरची शूटिंग, कॅमेरे या सगळ्या गोष्टी मी खूप मिस करत होते. पण, आता 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेच्या निमित्ताने खूप दिवसानंतर पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळणार आहेत, याचा मला खूप आनंद होत आहे. 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेत स्वीटी आणि मकरंदच्या लग्न सोहळ्याला अरुंधती खास हजेरी लावताना दिसणार आहे. मालिकेच्या येत्या भागात प्रेक्षकांना अरुंधती पाहायला मिळणार आहे.

Whats_app_banner