मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Arun Govil: अयोध्येत जाऊनही रामलल्लाचे दर्शन मिळाले नाही! टीव्हीचे ‘श्रीराम’ अरुण गोविल झाले नाराज

Arun Govil: अयोध्येत जाऊनही रामलल्लाचे दर्शन मिळाले नाही! टीव्हीचे ‘श्रीराम’ अरुण गोविल झाले नाराज

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 25, 2024 10:41 AM IST

Arun Govil Return Back From Ayodhya: राम मंदिराच्या कार्यक्रमाच्या एक दिवस आधीच अभिनेते अरुण गोविल अयोध्येला पोहोचले होते. मात्र, हा कार्यक्रम पार पडल्यानंतर अरुण गोविल निराश होऊन परतले आहेत.

Arun Govil Return Back From Ayodhya
Arun Govil Return Back From Ayodhya

Arun Govil Return Back From Ayodhya: रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा भव्यदिव्य सोहळा २२ जानेवारीला अयोध्येत विधीनुसार संपन्न झाला. या ग्रँड सोहळ्यात फिल्मी जगतातील अनेक स्टार्सही सहभागी झाले होते. 'रामायण' या गाजलेल्या टीव्ही मालिकेत भगवान रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यांनी देखील हा सोहळा अनुभवला. या ऐतिहासिक क्षणाबद्दल ते खूप आनंदी दिसत होता. कार्यक्रमाच्या एक दिवस आधीच अभिनेते अरुण गोविल अयोध्येला पोहोचले होते. मात्र, हा कार्यक्रम पार पडल्यानंतर अरुण गोविल निराश होऊन परतले आहेत.

अरुण गोविल यांनी राम मंदिर उभारणी आणि रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. हा सोहळा अनुभवल्यानंतर एक स्वप्न पूर्ण झाल्याचे त्यांनी म्हटले होते. पण, एका गोष्टीमुळे अरुण गोविल यांची प्रचंड निराशा झाली आहे. अयोध्येत जाऊनही अभिनेते अरुण गोविल रामलल्लाचे दर्शन घेऊ शकले नाहीत. सोमवारी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम झाल्यानंतर अरुण गोविल यांना मंदिरात जाण्याची संधी मिळू शकली नाही. यामुळे ते निराश होऊन घरी परतले आहेत. मीडियाशी बोलताना अरुण गोविल म्हणाले की, 'मंदिर बांधताना पाहणे हे माझे एक स्वप्न होते. पण, मला रामलल्ला पाहता आले नाही.’

Bigg Boss 17: ‘बिग बॉस १७’ घेणार प्रेक्षकांचा निरोप! कधी आणि कुठे पाहता येणार ग्रँड फिनालेचा सोहळा? वाचा...

मीडियाशी बोलताना अरुण गोविल म्हणाले की, ‘आपल्या सर्वांसाठी हा एक दिव्य क्षण होता, जो सगळ्यांनीच अतिशय भक्तीभावाने अनुभवला आहे.’ रामलल्लाच्या दर्शनाबाबत बोलताना अरुण गोविल म्हणाले की, मंदिरात खूप गर्दी असल्याने त्यांना नीट दर्शन घेता आले नाही. आता पुन्हा कधीतरी अयोध्येत जाऊन ते रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. अरुण गोविल यांच्या सोशल मीडियावर देखील सजलेल्या अयोध्येचे दर्शन चाहत्यांना घडले आहे. अरुण गोविल यांनी नुकतेच साऊथ स्टार्स राम चरण आणि चिरंजीवीसोबत पोज देतानाचे फोटो शेअर केले आहेत.

रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेवेळी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, रजनीकांत, चिरंजीवी आणि त्यांचा मुलगा राम चरण, माधुरी दीक्षित आणि त्यांचे पती डॉ.श्रीराम नेने, कंगना रनौत, रणबीर कपूर-आलिया भट्ट, रणदीप हुडा आणि पत्नी लिन लैश्राम, विकी कौशल आणि पत्नी कतरिना कैफ., गायक सोनू निगम, हरिहरन, शंकर महादेवन, दिग्दर्शक-निर्माता सुभाष घई, राजकुमार हिरानी आणि मधुर भांडारकर हे देखील उपस्थित होते.

WhatsApp channel