Arun Govil: शूटिंगच्या सेटवरच जखमी झाले 'रामायण' फेम अरुण गोविल; नेमकं काय घडलं?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Arun Govil: शूटिंगच्या सेटवरच जखमी झाले 'रामायण' फेम अरुण गोविल; नेमकं काय घडलं?

Arun Govil: शूटिंगच्या सेटवरच जखमी झाले 'रामायण' फेम अरुण गोविल; नेमकं काय घडलं?

Published Oct 25, 2023 07:37 AM IST

Arun Govil Injured: अभिनेते अरुण गोविल सध्या आपल्या आगामी चित्रपट 'नोटिस'च्या शूटिंगमध्ये व्यस्त झाले आहेत. दरम्यान, त्यांच्यासोबत एक अपघात घडला आहे

Arun Govil
Arun Govil

Arun Govil Injured: रामानंद सागर यांच्या 'रामायण'मध्ये भगवान श्री रामाची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेले अभिनेते अरुण गोविल सध्या आपल्या आगामी चित्रपट 'नोटिस'च्या शूटिंगमध्ये व्यस्त झाले आहेत. दरम्यान, त्यांच्यासोबत एक अपघात घडला आहे, ज्यामध्ये ते जखमी झाले आहेत. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवरच अरुण गोविल जखमी झाले आहेत. मात्र, आता त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात त्यांच्या कोपराला दुखापत झाली आहे. शूटिंग दरम्यान वेदना सहन करत त्यांनी काही सीन्स पूर्ण केले.

मीडिया रिपोर्टनुसार, 'नोटिस' चित्रपटाचे निर्माता आणि अभिनेता आदित्य प्रताप रघुवंशी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, चित्रपटाच्या शूटिंगच्या एका महत्त्वाच्या दृश्याचे चित्रीकरण सुरू असतानाच अरुण गोविल जखमी झाले. मात्र, आता त्यांची प्रकृती ठीक आहे. या आगामी चित्रपटात अभिनेता नारायण गुप्ताच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सीनमध्ये नारायण गुप्ता यांना ताब्यात घेण्यासाठी एक पोलीस अधिकारी येतो. या दृश्यादरम्यान त्यांना जीपची धडक बसली होती, ज्यात ते जखमी झाले होते.

Tharala Tar Mag 24th Oct: सायली आणि अर्जुनवर ठेवली जातेय पाळत! अखेर दुष्टांचा डाव उघड होईल?

याबद्दल माहिती देताना चित्रपटाचे निर्माता आणि अभिनेता आदित्य प्रताप रघुवंशी पुढे म्हणाले की, 'या दृश्यादरम्यान अरुण गोविल जखमी झाले. याच दृश्यात, ड्रायव्हर जीप रिव्हर्स घेत होता, नेमके तिथेच अरुण गोविल उभे होते आणि त्याचवेळी जीपने त्यांना धडक दिली. यात त्यांच्या कोपराला गंभीर दुखापत झाली. या घटनेदरम्यान सेटवरील सगळेच लोक खूप घाबरले होते. यानंतर चित्रपटाच्या संपूर्ण टीमने अरुण गोविल यांना मदत करण्यास सुरुवात केली. परंतु, त्यांनी जखमी होऊनही शूटिंग सुरूच ठेवले.

या दुखापतीवर तात्पुरती मलमपट्टी करून अरुण गोविल यांनी आपले सीन्स पूर्ण केले. यामुळे त्यांचे खूप कौतुकही होत आहे. या चित्रपटात अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया ३६ वर्षांनंतर एकत्र दिसणार आहेत. हे दोघेही रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिकेत श्री राम आणि माता सीता यांच्या भूमिकेत दिसले होते.

Whats_app_banner