मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Arun Govil: टीव्हीचे ‘राम’ मोठ्या पडद्यावर बनले पंतप्रधान नरेंद्र मोदी! अभिनेत्याचा लूक पाहून व्हाल हैराण

Arun Govil: टीव्हीचे ‘राम’ मोठ्या पडद्यावर बनले पंतप्रधान नरेंद्र मोदी! अभिनेत्याचा लूक पाहून व्हाल हैराण

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 09, 2024 10:28 AM IST

Arun Govil As PM Narendra Modi: अभिनेते अरुण गोविल हे एक अतिशय प्रसिद्ध अभिनेते आहेत. अरुण गोविल यांना लोक टीव्हीवरचे 'राम' म्हणूनही ओळखतात.

Arun Govil As PM Narendra Modi
Arun Govil As PM Narendra Modi

Arun Govil As PM Narendra Modi: काश्मिरी पंडितांच्या वेदना मांडणारे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. नुकताच 'आर्टिकल ३७०' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटामध्ये कलम ३७० हटवण्यावरून झालेला गदारोळ दाखवण्यात येणार आहे. ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पुलवामाची घटना दाखवण्यात आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना सांगितलेल्या गोष्टीही दाखवल्या आहेत. या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका अभिनेते अरुण गोविल यांनी साकारली आहे. या ट्रेलरमधील अरुण गोविल यांचा लूक पाहून सगळेच थक्क झाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेते अरुण गोविल हे एक अतिशय प्रसिद्ध अभिनेते आहेत. अरुण गोविल यांना लोक टीव्हीवरचे 'राम' म्हणूनही ओळखतात. अरुण गोविल यांनी ८०च्या दशकातील सुपरहिट धार्मिक शो 'रामायण'मध्ये भगवान रामाची भूमिका साकारली होती. आता ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटात अरुण गोविल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारताना दिसंणार आहे.

Rahul Roy Birthday: रातोरात सुपरस्टार झाला; एकापाठोपाठ ४७ चित्रपटही मिळाले! आता काय करतो ‘आशिकी’ फेम राहुल रॉय?

‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाचा ट्रेलर काश्मीरमधून सुरू होतो. यामध्ये यामी गौतम दाखवण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये एका दहशतवाद्याची मुलाखतही चित्रित करण्यात आली असून, काश्मीरमधील दंगलही दाखवण्यात आली आहे. पुढे ट्रेलरमध्ये पुलवामाची घटनाही दाखवण्यात आली होती. यांनतर अरुण गोविल पंतप्रधानांच्या भूमिकेत समोर येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या पार्थिवांना श्रद्धांजली अर्पण केली होती. यानंतर ते देशाला संबोधन करताना दाखवले आहे. अरुण गोविल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लूकमध्ये ओळखणे देखील कठीण वाटत आहे. त्यांचा लूक पूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा बनवण्यात आला आहे. हा चित्रपट २३ फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

पीएम मोदींच्या भूमिकेत दिसणारे अरुण गोविल त्यांच्या पात्राला पूर्ण न्याय देतील, अशी अशा सगळेच व्यक्त करत आहेत. या चित्रपटात अभिनेते किरण करमरकर गृहमंत्र्यांच्या भूमिकेत दिसले आहेत. 'कहानी घर घर की' फेम किरण करमरकर ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटात अमित शाह यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात यामी गौतम मुख्य भूमिकेत आहे, तर या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सुहास जांभळे यांनी केले आहे. आदित्य धर, लोकेश धर आणि ज्योती देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग