Arman Malik: डोंगरात गाडीचा टायर फुटला; 'बिग बॉस ओटीटी' फेम अरमान मलिकच्या कारचा झाला अपघात
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Arman Malik: डोंगरात गाडीचा टायर फुटला; 'बिग बॉस ओटीटी' फेम अरमान मलिकच्या कारचा झाला अपघात

Arman Malik: डोंगरात गाडीचा टायर फुटला; 'बिग बॉस ओटीटी' फेम अरमान मलिकच्या कारचा झाला अपघात

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 18, 2024 08:30 AM IST

Arman Malik: 'बिग बॉस ओटीटी' फेम अरमान मलिकच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. अपघाताच्या वेळी अरमान याच कारमधून जात होता. अरमानने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत अपघाताची माहिती दिली आहे.

Arman Malik
Arman Malik

Arman Malik car accident: प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस ओटीटी ३'मध्ये झळकलेला लोकप्रिय यूट्यूबर अरमान मलिकबाबत मोठी बातमी समोर येत आहे. अरमान मलिकच्या कारला भीषण अपघात झाला आहे. अपघाताच्या वेळी अरमान याच कारमधून जात होता. कारची अवस्था पाहून चाहत्यांना अरमानची चिंता वाटत आहे. पण अरमान या अपघातातून थोडक्याच बचावला आहे. त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. सर्वजण अरमानने शेअर केलेल्या या व्हिडीओवर कमेंट करताना दिसत आहेत.

अरमान मलिकच्या कारचा अपघात

अरमान मलिक हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे विशेष चर्चेत राहिला आहे. त्याच्या दोन बायका असल्याचे समोर येताच सर्वजण चकीत झाले होते. अरमानने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अरमान बोलताना दिसत आहे की, 'आठवडाभरापूर्वी मी या गाडीची तक्रार केली होती. आज आम्ही मनालीहून गाण्याचे शुटिंग करुन घरी परतत होतो. अचानक गाडीचा टायर फुटला आणि गाडी असंतुलित झाली. आम्ही मृत्यूच्या तोंडातून परत आलोय.'

चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

पुढे तो म्हणाला, 'मी गाडीत झोपलो होतो आणि योगेश गाडी चालवत होता. कृतिका मागे होती. आमच्यासोबत घडलेल्या घटनेत आम्ही बचावलो ही देवाची कृपा आहे.' हा व्हिडिओ शेअर करत अरमानने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आज आम्ही मृत्यूपासून वाचलो आहोत.' हा व्हिडिओ समोर येताच चाहते खूप चिंतेत पडले. यावर युजर्स कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
वाचा: पहिले लग्न मग ४ वर्षात घटस्फोट, दादा कोंडके यांच्या पत्नीविषयी माहिती आहे का?

अरमान मलिकविषयी

युट्यूबर अरमान मलिकने बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सिझनमध्ये सहभाग घेतला होता. त्याची तीन लग्न झाली आहेत. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर अरमानने पायल मलिकसोबत लग्न केले. त्यानंतर त्याने पायलची बेस्ट फ्रेंड कृतिकासोबत लग्न केले. इतकंच नाही तर अरमान त्याच्या दोन्ही पत्नी पायल आणि कृतिकासोबत बिग बॉस ओटीटी ३मध्ये सहभागी झाला होता. शोमध्ये गेल्यानंतर अरमानला त्याच्या दोन लग्नांबद्दल खूप ट्रोल करण्यात आलं होतं.

Whats_app_banner