Armaan Malik: सध्या युट्युबर अरमान मलिक प्रचंड चर्चेत आला आहे. दोन लग्न करणाऱ्या या युट्युबरच्या दोन्ही पत्नी एकाच वेळी प्रेग्नंट असल्याने आता नेटकरी त्याच्यावर प्रचंड टीका करत आहेत. स्वतः अरमान मलिक आणि त्याच्या पत्नींनी ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही गुडन्यूज जाहीर करताच आता या तिघांवरही टीकेची झोड उठली आहे. आधीच दोन लग्न केल्यामुळे त्याच्यावर टीका होत असतानाच, आता पुन्हा एकदा त्याला ट्रोल केले जात आहे.
नुकतेच अरमान मलिक याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अरमान त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत दिसत आहे. या फोटोंमध्ये अरमान आपल्या दोन्ही पत्नींसोबत फोटोशूट करताना दिसत आहे. यात त्यांचा मुलगा देखील त्यांच्यासोबत दिसत आहे. यावर आता त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. काहींनी ही देवाची देणगी असल्याचे म्हटले आहे. तर, काही मात्र या विरोधात बोलताना दिसत आहेत.
अरमान मलिक आणि त्याच्या पत्नी पायल मलिक व कृतिका मलिक हे संपूर्ण कुटुंब सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. शॉर्ट व्हिडीओंच्या माध्यमातून हे कुटुंब आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करत असतं. सोशल मीडियावर या कुटुंबाचे लाखो चाहते आहेत. अरमान मलिक आणि त्याची पहिली पत्नी पायल यांना आधी एक मुलगा आहे. आता पुन्हा एकदा त्याच्या घरात दोन चिमुकले पाहुणे येणार आहेत. मात्र, आता अरमानने त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच तो ट्रोल होऊ लागला आहे.
काही नेटकरी त्याच्या या फोटोंवर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एक युझरने लिहिले की, ‘लोक अशा मूर्ख लोकांना का सपोर्ट करतात? काही भारतीय चाहते खरंच मूर्ख असतात जे अशा लोकांना सपोर्ट करतात. लोकांनी जर चांगल्या व्यक्तींना आपला आदर्श मानले असते, तर आज देशाचे चित्र वेगळे दिसले असते.’ आणखी एका युझरने कमेंट करत म्हटले की, ‘आज पायल आणि कृतिका.. उद्या दोघींमध्ये आणखी तिसरी देखील येईल.’