अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर यांच्या आगामी 'मेरे हस्बैंड की बीवी' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. या चित्रपटाच्या सेटवर एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान मोठा अपघात झाला होता. खरं तर या गाण्याचं शूटिंग मुंबईतील इम्पीरियल पॅलेस ऑफ रॉयल पाम्समध्ये सुरू होतं. शुटिंग सुरू असताना अचानक छत कोसळले. या दुर्घटनेत अर्जुन कपूरसह अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र यात कोणीही गंभीर जखमी झाले नाही.
फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे अशोक दुबे यांनी ई टाइम्सशी खास बातचीत करताना सांगितले की, गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान मोठ्या आवाजामुळे निर्माण झालेल्या स्पंदनांमुळे हा अपघात झाला. या अपघातात अर्जुन कपूर, निर्माते जॅकी भगनानी आणि दिग्दर्शक मुदस्सर अजीज किरकोळ जखमी झाले आहेत.
अर्जुन कपूरच्या कोपराला आणि डोक्याला जखम झाल्याचे अशोक यांनी सांगितले आहे. या घटनेत काही क्रू मेंबर्सही जखमी झाले आहेत. डीओपी मनू आनंद यांचा अंगठा फ्रॅक्चर झाला आहे. यात कोणीही गंभीर जखमी झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. अशोक यांनी सांगितले की, त्यांच्या कॅमेरामॅनच्या मणक्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाचा: अमृता सिंगने एकदा सैफ अली खानला दिल्या होत्या झोपेच्या गोळ्या, काय होते कारण?
कोरिओग्राफर विजय गांगुलीने मीडिया पोर्टलला सांगितले की, शूटिंगचा पहिला दिवस खूप चांगला होता, पण दुसऱ्या दिवशी अपघात झाला. "आम्ही मॉनिटरवर होतो तेव्हा अचानक छत कोसळलं. सुदैवाने छप्पर काही भागात कोसळले. एकाच वेळी संपूर्ण छप्पर आमच्यावर कोसळले असते तर खूप वाईट झाले असते, पण तरीही अनेकांना इजा झाली." असे विजय यांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या