Arjun Kapoor: मलायकाच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चांवर अर्जुन कपूरने सोडलं मौन, म्हणाला “आमचं खासगी..."
Malaika Arora: गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मलायका प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता पुन्हा एकदा अर्जुनने यावर वक्तव्य केले आहे.
बॉलिवूडमधील सध्याचे सर्वांचे आवडते आणि लाडके कपल म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरा व अभिनेता अर्जुन कपूर. ते दोघे सतत एकत्र फिरताना दिसतात. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मलायका प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अर्जुनने यावर प्रतिक्रिया देत पूर्णविराम दिला होता. मात्र आता एका मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा यावर वक्तव्य केले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
अर्जुन कपूरने नुकतीच 'बॉलिवूड बबल'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तो म्हणाला की, “नकारात्मकता ही अत्यंत सोप्या पद्धतीने पसरवली जाऊ शकते. त्यामुळे लोकांचे लक्ष फार लवकर वेधले जाते. अशा गोष्टींकडे लोक खेचले जातात, म्हणूनच या अफवा लवकर पसरतात. आम्ही अभिनेते आहोत, पण आमचे खासगी आयुष्य हे नेहमीच खासगी नसते. अभिनयक्षेत्रात असल्याने काही प्रमाणात तुम्हाला अशा गोष्टी खपवून घ्यावा लागतात.”
पुढे तो म्हणाला, 'अशा वृत्तांमध्ये काही गोष्टींचा उल्लेख नसतो पण प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही माध्यमांवर अवलंबून असतो. पण आम्हीसुद्धा माणूसच आहोत याची तुम्ही किमान तरी दखल घ्यावी अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे आमच्याबद्दल खूप महत्त्वाचं काही लिहिताना किमान एकदा तरी आमच्याकडून सत्यता तपासून घ्या. किमान एवढं तरी करा. तुम्ही गोष्टी तपासून घेतल्या पाहिजेत, त्याबद्दल अंदाज वर्तवू नये. एखाद्या व्यक्तीसाठी खूप महत्त्वाची असणारी गोष्ट तुम्ही इतक्या सहजरित्या पसरवू नये.'
विभाग