मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘तू पुन्हा झेप घेशील!’; अर्जुन कपूरची बहीण अंशुलाची पोस्ट बघून होऊ शकतो मलायका अरोराचा जळफळाट

‘तू पुन्हा झेप घेशील!’; अर्जुन कपूरची बहीण अंशुलाची पोस्ट बघून होऊ शकतो मलायका अरोराचा जळफळाट

Jun 26, 2024 09:35 PM IST

मलायकाने अर्जुनच्या बर्थडेसाठी काहीही पोस्ट केलेले नाही. दरम्यान, आता अर्जुन कपूरची बहीण अंशुलाने अशी एक पोस्ट केली आहे, ज्यामुळे मलायकाचा जळफळाट होऊ शकतो.

अर्जुन कपूरची बहीण अंशुलाची पोस्ट बघून होऊ शकतो मलायका अरोराचा जळफळाट
अर्जुन कपूरची बहीण अंशुलाची पोस्ट बघून होऊ शकतो मलायका अरोराचा जळफळाट

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आज (२६ जून) त्याचा ३९वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने आदल्या रात्री १२ वाजता त्याच्या घरी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत त्याचे कुटुंब आणि खास मित्र अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते. पण, यादरम्यान अर्जुनच्या ‘लेडी लव्ह’ मलायकाच्या अनुपस्थितीमुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. यामुळे आता अर्जुन आणि मलायका अरोरा यांचे ब्रेकअप झाल्याचे लोकांना वाटू लागले आहे. त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. मलायकाने अर्जुनसाठी काहीही पोस्ट केलेले नाही. दरम्यान, आता अर्जुन कपूरची बहीण अंशुलाने अशी एक पोस्ट केली आहे, ज्यामुळे मलायकाचा जळफळाट होऊ शकतो.

अंशुला कपूरने काही काळापूर्वी तिचा भाऊ अर्जुन कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने अशा काही गोष्टी लिहिल्या आहेत, ज्या अर्जुन आणि मलायका यांच्या ब्रेकअपशी जोडल्या जात आहेत. अर्जुन आणि मलायकाच्या ब्रेकअपबाबत अंशुला कपूरची पोस्ट सोशल मीडियावर आता चांगलीच चर्चेत आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अंशुलाने दिला ब्रेकअपचा इशारा?

भाऊ अर्जुन कपूर यांच्यासोबतचे आनंदाचे क्षण शेअर करताना अंशुलाने बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडीओही शेअर केला आहे. यासोबतच तिने एक पोस्टही लिहिली आहे. अंशुला कपूर हिने लिहिले की, 'माझ्या नंबर वनला वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझा दादागिरी करणारा, माझा पहिला कुस्तीचा जोडीदार, माझा सर्वात मोठा चीअरलीडर, माझ्या सर्व स्वप्नांची पूर्तता करणारा… सर्वात मोठ्या हृदयाचा माणूस…. या वर्षी तुझ्यासाठी मी एकच प्रार्थना करेन की, तुझा स्वतःवर आणि तुझ्या क्षमतेवर विश्वास ठेवावास. आणि धडाकेबाज पुनरागमनासाठी तयारी करावीस. तुझी चिंता कमी होवो, तुमचे हसू आणखी खुलून येवो.’

अंशुलाने दिल्या भावाला शुभेच्छा!

अंशुलाने पुढे लिहिले की, 'मला आशा आहे की, तुझ्यातली आग कधीच विझणार नाही. तुला पुढे जाण्याची मिळत राहो. दयाळू व्यक्ती कशी असते, हे दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. तू माझ्यावर ज्या प्रकारे प्रेम करतोस त्याबद्दल धन्यवाद. मला नेहमी माझ्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची परवानगी दिल्याबद्दल, मला आधार दिल्याबद्दल आणि नेहमी मला साथ दिल्याबद्दल धन्यवाद. तुला आयुष्यात सगळं काही बेस्ट मिळो.’

WhatsApp channel