Arjun Kapoor Cryptic Post: बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मलायका आणि अर्जुन हे बी-टाऊनमधील पॉवर कपल्सपैकी एक मानले जातात. पण आता त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले आहे. पण दोघांनीही यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. ब्रेकअपच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर मलायकाने नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. त्यापाठोपाठ आता अर्जुनने देखील पोस्ट शेअर केली आहे.
अर्जुन कपूरने १ जुलै त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने दु:ख व्यक्त केल्याचे म्हटले जात आहे. पोस्टमध्ये अर्जुनने पश्चाताप झाल्यानंतर होणारे दु:ख हे आधीच स्वत:ला शिस्त लावताना होणाऱ्या वेदनांपेक्षा कमी असते असे म्हटले आहे. अर्जुनच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अनेकांनी या पोस्टवरुन मलायका आणि अर्जुनचा ब्रेकअप झाला असे म्हटले आहे.
वाचा: अशोक सराफ यांचा अनोखा लूक, 'लाईफलाईन' सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्यात वयात खूप अंतर आहे. त्यांच्यात वयात सुमारे १३ वर्षांचे अंतर आहे. गेल्या सहा वर्षांपासून ते दोघे एकमेकांना डेट करत आहे. अरबाज खानपासून विभक्त झाल्यानंतर मलायकाने २०१८मध्ये प्रेमाची कबूली दिली होती. दोघेही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत होते. पण आता त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले आहे. अर्जुन कपूरचा वाढदिवस नुकताच झाला. या वाढदिवसाला मलायका गैरहजर होती. त्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे.
वाचा: डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात 'हे' हिंदी चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
काही दिवसांपूर्वी मलायका अरोरा ही बालीला फिरायला गेल्याचे पाहायला मिळाले. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. तसेच त्यानंतर ती लंडनला देखील गेली होती. सर्व फोटोंमध्ये मलायका एकटी दिसत होती. त्यामुळे अर्जुन आणि मलायकाच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले होते. अशातच दोघे सोशल मीडियावर करत असलेल्या पोस्ट देखील अतिशय वेदनादायक असल्याचे दिसत आहे. मात्र, अद्याप दोघांनीहीयावर प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे चाहते सतत त्यांच्या आयुष्यात काय चालू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात.
संबंधित बातम्या