Arjun Kapoor Cryptic Post :बॉलिवूडमध्ये सध्या एकच चर्चा जोरदार सुरू आहे, ती म्हणजे अर्जुन कपूर आणि मलायका आरोराचे ब्रेकअप. अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. आणि या ब्रेकअपचे दुःख विसरून आता ती आपल्या आयुष्यात पुढे सरकल्याचे दिसत आहे. नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये मलायका एका मिस्ट्री मॅन सोबत दिसली आहे. तर, मलायका अरोराचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अर्जुन कपूर याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक खोचक पोस्ट लिहिली आहे.
काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरने एका कार्यक्रमात त्याच्या ब्रेकअपची पुष्टी केली होती आणि आपण सिंगल असल्याचे सगळ्यांसमोर सांगितले होते. त्याच वेळी, मलायका देखील ब्रेकअप झाल्यापासून एकामागून एक क्रिप्टिक पोस्ट शेअर करत होती. आणि आता ती नुकतीच एका अनोळखी माणसासोबत दिसली. यावेळी तिची बहीण अमृता अरोराही तिच्यासोबत होती.
मलायका मिस्ट्री मॅनसोबत दिसल्यानंतर अर्जुन कपूरने एक खोचक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटले की, दुसऱ्यांच्या आनंदात आपण आनंदी झालं पाहिजे. अर्थात दुसऱ्यांच्या आनंदात आपण आनंद शोधायला हवा, असे त्याने म्हटले आहे. आता त्याने ही पोस्ट मलायका अरोरासाठी लिहिल्याचे म्हटले जात आहे. मलायकाला आनंदात बघून अर्जुन आनंद शोधतोय का?, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. अर्जुन कपूर याने ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.
मलायकाला आनंदी पाहून आता चाहते देखील उत्सुक झाले आहे. तर, हा मिस्ट्री मॅन कोण आहे? अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायका दुसऱ्या कुणाला डेट करत आहे का?, असे प्रश्न अनेकांना पडला आहे.मात्र, काही लोक म्हणतात की, तो तिचा मित्र किंवा सहकारी असू शकतो.
व्हिडिओमध्ये मलायका त्या व्यक्तीचा हात धरून हसताना आणि आनंदी होताना दिसत आहे. आता तो कोण आहे हे लवकरच कळेल. पण मलायकाकडे पाहता ती प्रत्येक परिस्थिती हसतमुखाने स्वीकारत असल्याचे दिसते. तिचे तुटलेले हृदय तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.परंतु, ती थेट काहीही बोलणे टाळत आहे. त्याचवेळी, काही दिवसांपूर्वी मलायका एका अनोळखी व्यक्तीसोबत डिनर डेटवर स्पॉट झाली होती. त्यावेळीही युजर्सनी ही अभिनेत्री आता दुसऱ्या कोणाला तरी डेट करत असल्याचा अंदाज लावला होता.