बॉलिवूडमध्ये प्रदर्शित होणारा प्रत्येक चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेलच असे नाही. काही चित्रपट सुपरहिट ठरतात तर काही चित्रपट बजेट जास्त असूनही फ्लॉप ठरतात. असे अनेक चित्रपट आहेत ज्यामध्ये बॉलिवूडमधील चांगले कलाकार आहेत, चांगले बजेट होते पण बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाविषयी सांगणार आहोत. या चित्रपटाचे बजेट ४५ कोटी रुपये होते आणि बॉक्स ऑफिसवर केवळ ०.०१ कोटी रुपये कमावले.
अजय बहलचा रोमँटिक थ्रिलर चित्रपट गेल्या वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. त्याचे बजेट ४५ कोटी रुपये होते. या चित्रपटात नवे स्टार नसून अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर सारखे मोठे कलाकार होते. तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ ०.०१ कोटी रुपयांची कमाई केली. तुम्हाला या मेगाफ्लॉप सिनेमाचे नाव माहित आहे का? नाही ना! मग चला जाणून घेऊया...
'द लेडी किलर' असं या सिनेमाचं नाव आहे. निर्माते जेव्हा हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करत होते, तेव्हा त्यांनी ना सोशल मीडियावर त्याचे प्रमोशन केले ना ग्राउंड लेव्हलवर. त्यामुळे हा चित्रपट चित्रपटगृहात टिकू शकला नाही. आता निर्मात्यांनी हा चित्रपट टी-सीरिजच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर रिलीज केला आहे, मात्र त्याचे कोणतेही प्रमोशन झालेले नाही. तसेच या चित्रपटाला ओटीटी रिलीजसाठी खरेदीदार मिळाला नसल्यामुळे यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात येत आहे.
चित्रपट दिग्दर्शक अजय बहल यांनी चित्रपट प्रदर्शित होताच आपला चित्रपट अपूर्ण असल्याची कबुली दिली. त्यानी चित्रपटाच्या खाली यूट्यूबवर कमेंट करत लिहिले की, 'होय, चित्रपट अपूर्ण आहे. ११७ पानांच्या पटकथेतील ३० पानांचे चित्रीकरण कधी झालेच नाही. अनेक कनेक्टिंग सीन्स, अर्जुन आणि भूमीचा रोमान्स, भूमिचे दारूवरचे व्यसन, अर्जुनचा मूड... यापैकी काहीच दाखवलेले नाही.'
वाचा: 'मला पैसा, ड्रग्ज आणि महिलांचे व्यसन लागले होते', प्रसिद्ध रॅपरचा धक्कादायक खुलासा
दिग्दर्शक पुढे म्हणाला, 'लेडी किलर'चे चित्रीकरण अत्यंत वेदनादायक होते. कलाकारांमुळे नाही. अर्जुन आणि भूमीसोबत काम करताना खूप मजा आली. त्यांनी आपला जीव ओतला होता. प्रॉब्लेम इतरत्र होता, पण ती गोष्ट वेगळी आहे.' टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार यांनी चित्रपटाचे आउटडोअर शेड्यूल शूट होऊ दिले नाही कारण त्यांना उत्तराखंडमध्ये चित्रीकरण करायचे होते आणि सतत पाऊस पडत होता. अशा तऱ्हेने चित्रपटाचे जेवढे चित्रीकरण झाले, तेवढेच सीन चित्रपटात टाकून तो प्रदर्शित करण्यात आला.