मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: मलायका अरोराचा मुलगा रवीना टंडनच्या मुलीच्या प्रेमात? अरहान आणि राशा पुन्हा दिसले एकत्र!

Viral Video: मलायका अरोराचा मुलगा रवीना टंडनच्या मुलीच्या प्रेमात? अरहान आणि राशा पुन्हा दिसले एकत्र!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 26, 2024 10:42 AM IST

Arhaan Khan Rasha Thadani Viral Video: गेल्या काही दिवसांपासून अरहान खान याचे नाव अभिनेत्री रवीना टंडन हिची मुलगी राशा थडानीसोबत जोडले जात आहे.

Arhaan Khan Rasha Thadani Viral Video
Arhaan Khan Rasha Thadani Viral Video

Arhaan Khan Rasha Thadani Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान यांचा मुलगा अरहान हा देखील आता त्याच्या आई-वडिलांप्रमाणेच त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आला आहे. अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप आणि पॅचअपच्या अफवांमुळे मलायका रोजच चर्चेत असते. त्याचवेळी अरबाज खानने नुकतेच शूरा खानसोबत लग्न करून सगळ्यांनाच धक्का दिला होता. आता त्यांचा मुलगा अरहान खान हा देखील त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याचे नाव अभिनेत्री रवीना टंडन हिची मुलगी राशा थडानीसोबत जोडले जात आहे.

राशा थडानी आणि अरहान खान दोघेही अनेकवेळा एकत्र स्पॉट होत असतात. या दोघांना अनेकदा मीडियाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. आता पुन्हा एकदा हे कथित लव्ह बर्ड्स एकत्र दिसले. आता राशा थडानी आणि अरहान खान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हिडीओमध्ये राशा थडानी अरहान खानसोबत दिसत आहे. या व्हिडीओमध्ये राशा लिंबू रंगाच्या हॉट ड्रेसमध्ये दिसत आहे. तर, मलायकाचा मुलगा अरहान खान पांढऱ्या टी-शर्ट आणि काळ्या पँटमध्ये दिसत आहे. अरहान पुढे चालत आहे आणि राशा त्याच्या मागे चालत असल्याचे दिसत आहे. यावेळी दोघेही मीडियाकडे बघून हसताना दिसत होते. अरहानने पापाराझींशी संवाद साधला, तर राशा मात्र लाजून गाडीत बसली.

Abhishek Bachchan: अभिषेक बच्चन ऐश्वर्या रायला घटस्फोट देणार का? नव्या पोस्टमुळे पुन्हा चर्चांना उधाण!

यानंतर दोघेही एकाच कारमध्ये बसून हसत हसत बोलतांना दिसत आहेत. दोघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी पुन्हा एकदा त्यांची नावे एकमेकांशी जोडण्यास सुरुवात केली. आता या व्हिडीओनंतर त्यांच्या डेटिंगच्या अफवा पुन्हा चर्चेत आल्या आहेत. आता या व्हायरल व्हिडीओंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.

काही जण या दोघांना क्युट कपल म्हणत आहेत. तर, काही जण मात्र दोघांना ट्रोल करताना दिसत आहेत. एका व्यक्तीने लिहिले की, 'आईचे आयुष्य वेगळे, वडिलांचे आयुष्य वेगळे आणि मुलाचे आयुष्य वेगळे.' एकाने गंमतीत म्हटलेय की, 'बापाबरोबरच मुलालाही मैत्रीण मिळाली.' आणखी एकाने लिहिले की, 'नवीन चित्रपट येणार आहे... त्याची जाहिरात आतापासून चालू आहे.' तर, एकाने ट्रोल करत म्हटले की, 'आई डेट करतेय, वडिलांचं नुकतच लग्न झालंय, आता मुलगाही डेट करतोय, काय फॅमिली आहे.' तर, काही लोक याला पब्लिसिटी स्टंट म्हणत आहेत.

WhatsApp channel

विभाग