Naga Chaitanya-Sobhita Dhulipala:साऊथ स्टार नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या अफेअरच्या चर्चा अनेक महिन्यांपासून होत होत्या.मात्र नव्या रिपोर्टनुसार, आज म्हणजेच ८ ऑगस्टला नागा चैतन्य शोभितासोबत एंगेजमेंट करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुपरस्टार नागा चैतन्यचे वडील नागार्जुन देखील त्यांच्या एंगेजमेंटनंतर दोघांच्या लग्नाची अधिकृत घोषणा करू शकतात.नागा चैतन्यने २०२१मध्ये समंथा रूथ प्रभूला घटस्फोट दिला. त्यानंतर त्याने अभिनेत्री शोभिताला डेट करण्यास सुरुवात केली. वास्तविक, नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या डेटिंगच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. आता त्यांच्या एंगेजमेंटच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नागा चैतन्य आणि शोभिता आज म्हणजेच ८ ऑगस्टला साखरपुडा करणार आहेत.मीडिया रिपोर्ट्सनुसार, नागा चैतन्य आणि शोभिता यांचा साखरपुडा अभिनेत्याच्या घरीच होणार आहे. तथापि, कुटुंब किंवा अभिनेत्याकडून अद्याप कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा झालेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नागा स्वतः सोशल मीडियावर त्याच्या एंगेजमेंटची माहिती देऊ शकतो, त्यासोबतच त्याच्या लग्नाची तारीखही जाहीर केली जाऊ शकते.
२०१७मध्ये नागा चैतन्यने अभिनेत्री समंथा रुथ प्रभूशी लग्न केले होते. परंतु, त्यांचे नाते काही वर्षेच टिकले. २०२१मध्येच त्यांचा घटस्फोट झाला. शोभितासोबतच्या आणि नागाच्या साखरपुड्याची बातमी समोर आल्यानंतर नागाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. तर, समंथाचे चाहते संतापलेले दिसले आहेत. समंथा आणि नागानेअनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. चित्रपट'ये माया चेसावे', 'माझीली', ऑटोनगर सूर्या', 'बेबी' आणि'मनम'मध्ये एकत्र काम केले होते.'ये माया चेसावे' हा समंथा रुथ प्रभूचा डेब्यू चित्रपट होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, समंथा अद्याप सिंगल असताना, घटस्फोटानंतर लगेचच नागा चैतन्यने शोभिता धुलिपालाला डेट करायला सुरुवात केली. मात्र, दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याबद्दल जाहीरपणे काहीही सांगितलेले नाही. मात्र, दोघांना अनेकदा एकत्र पाहण्यात आले आहे. लंडनमध्ये लंच डेटवरही दोघे एकत्र दिसले होते.मीडिया रिपोर्ट्सनुसार, नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला त्यांच्या एंगेजमेंटनंतर लवकरच लग्न करणार आहेत. त्यांची एंगेजमेंट आज म्हणजेच गुरुवार, ८ ऑगस्ट रोजी आहे. एंगेजमेंटनंतर नागा चैतन्य स्वतः सोशल मीडियावर चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर करणार आहे. त्याचवेळी, नागाचे वडील आणि अभिनेता नागार्जुन एंगेजमेंटनंतर नागा आणि शोभिताच्या लग्नाची घोषणा करू शकतात.