बॉलिवूड निर्माता, अभिनेता अरबाज खानने काही दिवसांपूर्वी दुसऱ्यांदा लग्न केले. त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आता अरबाजची पत्नी शूरा खान आणि मलायका अरोराचा मुलगा अरहान खान यांचे चांगले संबंध असल्याचे दिसत आहे. दोघेही अनेकदा एकत्र दिसले आहेत. नुकताच अरहान आणि शूरा मुंबईत दिसले, ज्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. दोघेही एकाच गाडीतून गेल्याचे देखील दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शूरा खानने चॉकलेट ब्राऊन कलरचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता, तर केसांना क्लचर लावला होता. तर, अरहान खानने फुल स्लीव्ह टी-शर्ट आणि लाइट ब्लू कलरडेनिम परिधान केले होते. अरहान मोबाइलवर कोणाशी तरी बोलताना दिसला. व्हिडिओमध्ये शूरा कारच्या पुढच्या सीटवर बसली होती. तर अरहान मागच्या सीटवर बसला होता. हा व्हिडिओ पॅपराझी वरिंदर चावलाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ आता तुफान व्हायरल झाला आहे.
शुरा आणि अरहानचा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या पोस्टला १४ हजारांहून अधिक लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, शूरा उर्मिला मातोंडकरसारखी दिसते. तर अन्य काही युजर्सनीही यावर कमेंट करत हॉर्ट इमोजी वापरला आहे. तर काहीजण दोघांच्या नात्याचं कौतुक करत आहेत. कोणी म्हणत आहे की अरहानचे त्याच्या सावत्र आईसोबत मित्रासारखे नाते आहे. दोघांचेही नाते चाहत्यांना आवडत आहे.
अरबाज आणि शूरा च्या लग्नात अरहानने एक खास परफॉर्मन्सही दिला होता. वडिलांच्या दुसऱ्या लग्नामुळे तो खूप खूश होता. अरहान हा अरबाज आणि अभिनेत्री मलायका अरोराचा मुलगा आ हे. अरबाज आणि मलायका नेहमी मुलासाठी एकत्र येताना दिसतात. आता अरहानचे सावत्र आईसोबत देखील चांगले नाते असल्याचे समोर आले आहे.
वाचा : “ सुरज चव्हाणने सहानुभूतीच्या जीवावर बिग बॉस जिंकलं नाही पाहिजे ”, अभिनेता स्पष्टच बोलला
शूराबद्दल सांगतो की, ती व्यवसायाने मेकअप आर्टिस्ट आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तिचे आणि अरबाजचे लग्न झाले होते. सलमान खानची बहीण अर्पिताच्या घरी झालेल्या सोहळ्यानंतर अरबाजने ही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.