मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Arbaaz Khan Video: गुडघ्यावर बसला, हातात पुष्पगुच्छ...; अरबाज खानने शूराला कसं केलं प्रपोज? पाहा...

Arbaaz Khan Video: गुडघ्यावर बसला, हातात पुष्पगुच्छ...; अरबाज खानने शूराला कसं केलं प्रपोज? पाहा...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 01, 2024 01:40 PM IST

Arbaaz Khan Marriage Propose Video: लग्नाच्या एका आठवड्यानंतर शूराने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अरबाज तिला प्रपोज करताना दिसत आहे.

Arbaaz Khan Marriage Propose Video
Arbaaz Khan Marriage Propose Video

Arbaaz Khan Marriage Propose Video: बॉलिवूची नवविवाहित जोडी अरबाज खान आणि शूरा खान सध्या हनीमूनसाठी रवाना झाले आहेत. २४ डिसेंबरला दोघांचे लग्न झाले आहे. अरबाज आणि शूरा यांनी एका छोटेखानी खाजगी निकाह सोहळ्यात एकमेकांना जोडीदार म्हणून स्वीकारले होते. अर्पिता खानच्या मुंबईतील घरी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यामध्ये फक्त कुटुंबातील काही सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. लग्नाच्या एका आठवड्यानंतर शूराने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अरबाज तिला प्रपोज करताना दिसत आहे.

अरबाजने अतिशय रोमँटिक पद्धतीने शूराला लग्नासाठी प्रपोज केले होते. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तो गुडघ्यावर बसतो आणि शूराला फुलांचा गुच्छ देतो. यावेळी अरबाजचा २१ वर्षांचा मुलगा अरहान खान, बहीण अर्पिता खान, आयुष शर्मा आणि इतर मित्रमंडळीही ही उपस्थित होते. तिला पुष्पगुच्छासोबतच अंगठी देऊन लग्नासाठी प्रपोज करतो.

Rakulpreet Singh Wedding: नव्या वर्षात रकुल प्रीत सिंह अडकणार लग्नबंधनात! ‘या’ दिवशी घेणार सात फेरे­

लग्नाच्या काही दिवस आधी शूट केलेल्या या व्हिडीओमध्ये अरबाज शूराला पुष्पगुच्छासोबत प्रपोजलची अंगठी देताना दिसतो. यानंतर अरबाज शूराला अंगठी घालतो. यावेळी ती लाजते आणि दोघे एकमेकांना मिठी मारतात. यावेळी अर्पिता आणि आयुषसह अरहानने देखील दोघांच्या नावाने जल्लोष केला. शूराने या व्हिडीओसोबत लिहिले की, त्याने तिला लग्नाच्या ५ दिवस आधी प्रपोज केले होते. कॅप्शनमध्ये शूराने लिहिले की, ‘१९ मे रोजी हो म्हणण्यापासून ते २४ डिसेंबरला लग्न करण्यापर्यंत सर्व काही फार लवकर झाले.' या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये अरबाजने लिहिले की, 'गुडघ्यावर बसून, त्यादिवशी मला सगळ्यात उंचीवर असल्यासारखे वाटले.’

शनिवारी (३० डिसेंबर) अरबाज आणि शूरा मुंबई विमानतळावर एकमेकांचा हात धरून परदेशी जाताना दिसले होते. दोघेही न्यू इयर सेलिब्रेशन आणि हनिमूनसाठी गेले आहेत. अरबाज आणि शूरा यांची भेट ‘पटना शुक्ला’ चित्रपटाच्या सेटवर झाली. या चित्रपटाची निर्मिती अरबाज खान याने केली आहे. शूरा पेशाने बॉलिवूडमधील मेकअप आर्टिस्ट आहे.

WhatsApp channel

विभाग