Arbaaz Khan Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या वडिलांच्या निधनाची बातमी येताच अरबाज खान सर्वात आधी तिच्या घरी पोहोचला होता. यावेळी लोकांनी अरबाजचे खूप कौतुक केले. आता अरबाजचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून लोक त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे कौतुक करत आहेत. मलायकाच्या वडिलांना शेवटचा निरोप देण्यासाठी अरबाज खान गुरुवारी सकाळी त्याची दुसरी पत्नी शूरासोबत आला होता.
मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. गुरुवारी सकाळपासूनच मलायकाचे अनेक मित्र तिच्या वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले होते. यावेळी मलायकाचा पूर्व पती अरबाज खान देखील त्याची पत्नी शूरासोबत अंत्यदर्शनाला पोहोचला होता. जेव्हा अरबाज आणि शूरा यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला, तेव्हापासून लोक सलीम खान यांच्या संस्कारांचे कौतुक करत आहेत. मलायका अरबाजची एक्स पत्नी आहे. मलायकासोबत घटस्फोट झाल्यानंतर अरबाज खानने शूरासोबत दुसरे लग्न केले आहे.
पापाराझींच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या अरबाज आणि शूराच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या कमेंट पाहायला मिळत आहेत. अनेकांनी अरबाज आणि शूराचे कौतुक केले आहे. यातील एका युजरने म्हटले की, ‘सलाम अरबाज… तू एक जेंटलमन आहे.’ आणखी एकाने लिहिले की, ‘या व्यक्तीला सलाम. अरबाज खानला त्याची कर्तव्ये काय आहेत हे चांगलेच ठाऊक आहे.’ एका युजरने लिहिले, ‘खान फॅमिलीसाठी रेस्पेक्ट बटन.’ आणखी एकाने लिहिले की, ‘अरबाजचे संगोपन आणि संस्कार फार चांगले आहेत.’ आणखी एक कमेंट आशी आहे की, ‘हे मी आधी कुठेही वाचलं, पाहिलं किंवा ऐकलं नाही. त्यांचं कुटुंब तुटल्यानंतरही तो तेथे गेला. त्यांच्यासोबत पत्नीही गेली होती.’
घटस्फोटानंतरही मलायका आणि अरबाज एकमेकांसोबत हँग आउट करताना दिसतात. दोघेही आपल्या मुलाला एकत्र वाढवत आहेत, त्यामुळे या काळात ते अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. घटस्फोटानंतरही दोघेही मैत्रीपूर्ण नाते जपत आहेत. त्यामुळेच आता या कठीण काळात तो मलायकासोबत खांद्याला खांदा लावून उभा आहे. काल मलायकाच्या वडिलांचे निधन होताच अरबाज सर्वात आधी तिच्या घरी पोहोचला, स्वतः अभिनेत्री आणि अर्जुन कपूर नंतर या ठिकाणी आले.
करीना कपूर, सैफ अली खान, सोहेल खान, करिश्मा कपूर आणि तिचे अनेक जवळचे मित्र मलायकाच्या वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचले होते. मलायकाचे वडील अनिल मेहता यांनी सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती.